शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सद्भावना रॅलीतून संस्कृतीचे दर्शन

By admin | Updated: December 27, 2016 02:30 IST

गावागावात उमटणारे नाताळ गीताचे सूर, घरोघरी उभारलेले नाताळगोठे, सजवलेले ख्रिसमस ट्री यामुळे वसई परिसर सद्या नाताळमय झालेला आहे.

वसई : गावागावात उमटणारे नाताळ गीताचे सूर, घरोघरी उभारलेले नाताळगोठे, सजवलेले ख्रिसमस ट्री यामुळे वसई परिसर सद्या नाताळमय झालेला आहे. वसईतील ख्रिस्ती बांधवांचा मोठा सण असलेल्या या नाताळ सणानिमित्त कार्निव्हलची धूम सध्या पहायला मिळत आहे.नाताळनिमित्ताने वसईत कार्निव्हलची सद्भावना रॅली काढण्यात आली होती. वसईतील संस्कृतीवर आधारित देखावे, स्वच्छ वसई -सुंदर वसईचा संदेश, पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या युवक -युवती,कोळी गाण्यांवर ठेका धरून नृत्य करणारे कोळी ,पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली वाडवळ व ख्रिस्ती विवाहांची लग्नाची वरात,लेझीम ,शिवाजी,राणी लक्ष्मीबाई व मदर तेरेसा यांचा पेहराव केलेले तरूण मुले-मुली सोबत उंट, घोडे, बैलगाडी या कार्निव्हलमध्ये सहभागी झाले होते. डिजे,लाईव्ह आॅर्केस्ट्रा व बॅण्डच्या तालावर वसईकर बेधुंद होऊन नाचत होते. या कार्निव्हलमध्ये गिफ्ट व चॉकलेट वाटणारा सांताक्लॉज बच्चे कंपनीचे लक्ष वेधून घेत होता. ही कार्निव्हल रॅली पहायला रस्त्याच्या दुतर्फा नागरीकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जवळजवळ ५०० नागरीकांनी यामध्ये सहभाग घेतला.कार्निव्हलचे आयोजन प्रभू येशूच्या जन्माचा मंगल संदेश घराघरात पोहचावा व सर्मधर्म समभावाचे नातें निर्माण व्हाव यासाठी या सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. घोगाळे येथून निघालेली कार्निव्हल सद्भावना रॅली बंगली नाका -पापडी -तामतलाव -पारनाका -रमेदी या मार्गावरून नेण्यात आली. घोगाळे ग्रामस्थांच्या वतीने गेली ५ वर्ष या कार्निव्हलचे आयोजन करण्यात येते.