शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

पालघर पोलिसांनी वाचवले २२ नागरिकांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 01:29 IST

संकटात सापडलेल्या नागरिकांचा शोध घेत त्यांची सुटका करण्यासाठी आणि आपले सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, विक्रांत देशमुख यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कामाला लागले होते.

हितेन नाईकपालघर : जिल्ह्यात तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वसामान्यांचे जीवन अस्तव्यस्त करून टाकले असताना अनेक सखल भागात साचलेल्या पाण्यातून, प्रवाहातून पालघर पोलिसांनी २२ नागरिकांचे प्राण वाचविण्याची कामगिरी करून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस दल समर्थ असल्याचे दाखवून दिले.

संकटात सापडलेल्या नागरिकांचा शोध घेत त्यांची सुटका करण्यासाठी आणि आपले सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, विक्रांत देशमुख यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कामाला लागले होते. केळवा पोलीस ठाणे हद्दीत माकूनसार या गावाच्या पुढे असलेल्या ब्रह्मदेव मंदिराच्या आसपास खारटनमध्ये पाण्याची पातळी वाढून सागर व सारिका चौधरी हे दांपत्य शेतावरील घरात अडकले होते. त्यांच्याबरोबरच अन्य दहा-बारा पुरुष व स्त्रिया समुद्राला भरती आल्याने त्यात सापडले असताना सपोनि मानसिंग पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी फायबर बोटीच्या साह्याने पाण्यात उतरून त्या सर्वांची सुटका करून त्यांना बाहेर काढले.सातपाटी सागरी पोलीस ठाणे हद्दीत पानेरी नदीजवळ हरिओम मिश्रा हा पाण्याची पातळी वाढल्याने झाडावर चढला होता. सुटका व्हावी म्हणून तो मदतीची याचना करीत असल्याची माहिती सपोनि जितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या टीमला केल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन त्या इसमाची सुटका करून त्याच्यावर उपचार केले. सफाळा पोलीस ठाणे हद्दीत लालठाणे गावाच्या बाजूला आणि घोलवड पोलीस हद्दीत एका रस्त्यावर दरडसदृश्य माती सपोनि सुनील जाधव आणि प्रकाश सोनावणे यांच्या टीमने दूर केली. 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार