शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चाेरीच्या उद्देशाने केली सुरक्षारक्षकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:59 IST

तिघे अटकेत : अल्पवयीन मुलांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : सोमवारी पहाटे संख्येश्वरनगरमध्ये राहणाऱ्या सुरक्षारक्षकाचा कामावर जाताना चाकूने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली होती. या हत्येप्रकरणी तुळिंज पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हत्येपूर्वी त्यांनी दाेघांना लुटले असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, तुळिंज पाेलिसांची गस्त असती तर या तिन्ही घटनाच घडल्या नसत्या आणि सुरक्षारक्षकाचा जीवही वाचला असता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

ओम साई चाळीत राहणाऱ्या कैलास देवेंद्र पाठक (४८) यांची कामावर जात असताना घराजवळच तीन आरोपींनी पैसे किंवा मोबाइलसाठी हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या तीन आरोपींपैकी दोन आरोपी हे १६ वर्षांचे आहेत. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी हितेश मंगेश भोसले (१८) याला अटक केले आहे. या तिन्ही आरोपींनी या हत्येपूर्वी पहाटे ३ ते पावणे चार वाजण्याच्या दरम्यान जबरी चोरीचे दोन गुन्हे केल्याचेही पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून पोलिसांनी चाकू जप्त केला आहे. निळेगावात राहणारा रिक्षाचालक अमोल जयराम इंगळे (३२) याच्यावर साडेतीन वाजण्याच्या सुमारास नवनीत हॉस्पिटलजवळ चाकूचा धाक दाखवून छाती व पोटावर हल्ला केला.  त्यांनी अमोलच्या खिशातील ५०० रुपये काढून मोबाइल खेचून पळून गेले. तर दुसऱ्या घटनेत ४ वाजण्याच्या सुमारास संख्येश्वरनगरमध्येच टॅक्सीचालक हसमतअली पठाण (६८) यांनाही याच तिघांनी हातात चाकू घेऊन मनसे ऑफिसच्या जवळ चाकू मारण्याचा धाक दाखवून ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना जखमी करून पैसे आणि मोबाइल हिसकावून पळून गेले. तिसऱ्या घटनेत सुरक्षारक्षकाने पैसे व मोबाइल देण्यास नकार दिल्यानंतर त्याची हत्या केल्याचा  संशय आहे.

हत्येप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना गजाआड केले आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना भिवंडी बालसुधारगृहात पाठवले आहे. एका आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. - राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज पोलीस ठाणे