शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वसईत महावितरणची थकबाकी २०० कोटींवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 00:42 IST

बिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित 

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : महावितरणच्या वसई मंडळात वीजबिल थकबाकी तब्बल २०० कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. या विक्रमी थकबाकीसह चालू वीजबिल वसूल करण्यासाठी सध्या वसई व विरार विभागात व्यापक मोहीम सुरू आहे. चालू वीजबिलासह थकबाकी भरून कठीण आर्थिक परिस्थितीत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. 

 वसई मंडलात वसई आणि विरार हे दोन विभाग आहेत. वसई विभागात सर्व वर्गवारीचे मिळून जवळपास ३ लाख ६८ हजार तर विरार विभागात ५ लाख ६२ हजार वीज ग्राहक आहेत. वसई विभागातील ३३ हजार तर विरार विभागातील ४७ हजार ग्राहकांनी मार्च २०२० नंतर गेल्या वर्षभरात वीजबिलाचा एक रुपयाही भरलेला नव्हता. या ग्राहकांकडे अनुक्रमे ३६ व ४२ कोटी असे एकूण ७८ कोटी रुपयांची थकबाकी होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सातत्याने पाठपुरावा व विनंती केल्यानंतर यातील २८ कोटी रुपयांची आतापर्यंत वसुली होऊ शकली. उर्वरित थकबाकीपैकी २७ कोटी रुपये वसई विभागातील २५ हजार ३०० ग्राहकांकडे तर २३ कोटी विरार विभागातील २८ हजार ६०० ग्राहकांकडे थकीत आहेत. 

अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी चोरून अथवा इतरांकडून वीजपुरवठा सुरू ठेवल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहक व अनधिकृतपणे वीज देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष पथकांची करडी नजर या ग्राहकांवर राहणार आहे. वसई मंडळात गेल्या वर्षभरातील १२२ कोटी व त्यापूर्वीचे ७८ कोटी असे एकूण २०० कोटी रुपयांचे थकीत वीजबिल वसूल करण्याचे आव्हान आहे. वसुलीत मदतीसाठी कल्याण परिमंडल कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या थकबाकीचे ओझे घेऊनच महावितरण कर्मचाऱ्यांना मार्च अखेरच्या वसुलीला सामोरे जावे लागणार आहे.