शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या चमकोगिरीने मोदी अस्वस्थ

By admin | Updated: October 6, 2014 03:56 IST

औरंगाबाद आणि बीडच्या प्रचार सभा गाजविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या सभेत मात्र अस्वस्थ असल्याचे दिसले.

मुंबई : औरंगाबाद आणि बीडच्या प्रचार सभा गाजविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या सभेत मात्र अस्वस्थ असल्याचे दिसले. भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मोदी आल्यानंतरही भाषण करत राहिले, तसेच काही गुजराती नेते काहीबाही सांगण्यासाठी जवळ जात असल्याने ही नाराजी असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.सभेसाठी नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन होत असताना भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे भाषण सुरू होते. मात्र मोदी आल्यानंतरही त्यांनी स्वत:चे भाषण सुरूच ठेवले. प्रकाश मेहता, सुनील राणे, किरीट सोमैया तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सूचना करूनही शेलार थांबले नव्हते याकडे काही कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. भाजपात प्रवेश करणाऱ्या रमेश शेंडगे यांचे मोदींनी उत्साहात स्वागत केले. मात्र त्यानंतर ते काहीसे अस्वस्थ झाल्याचे कार्यकर्त्यांना दिसून आले. व्यासपीठावरील भाजपा नेते राज पुरोहित, अमित शहा, मंगलप्रभात लोढा असे काही गुजराती नेते एकामागोमाग मोदींजवळ येत त्यांच्या कानात कुजबुज करीत असल्याचे दृश्य दिसत होते. मोदी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतानाही या नेत्यांची कुजबुज थांबत नव्हती. या प्रकाराने मोदी नाराज झाले असावेत आणि त्यामुळेच भाषणादरम्यान ते काहीसे अस्वस्थ झाल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे भाषण सुरू असताना आशिष शेलार यांनी पंतप्रधानांशेजारची खुर्ची पटकावली आणि तेही त्यांच्या कानात काहीतरी सांगू लागले. या कुजबुजीचा तपशील कळला नसला तरी मुंबईतील नेत्यांच्या अशा चमकोगिरीमुळेच मोदींना भाषणात सूर गवसायला अडचण आल्याची प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आधीच्या दोन्ही सभांमध्ये स्थानिक विषयांवर मांड टाकून मोदींनी तुफान फटकेबाजी केली. पण मुंबईच्या सभेत तो प्रभाव दिसला नाही, असेही कार्यकर्त्यांचे मत आहे. (प्रतिनिधी)