शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मालकिणीने कामगारांच्या अंगावर घातली गाडी; पालघरमधील कंपनीच्या गेटवर संतापजनक प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:49 IST

पालघर पूर्व येथील  मस्तांग इंटरप्राइजेस ही सॉक्स  बनवणारी कंपनी असून, या कंपनीत  वर्षांपासून काम करणाऱ्या  ४५ कामगारांना ८ तासांऐवजी १२ तास काम करावे लागेल, अशा सूचना देण्यात आल्या.

पालघर : पालघर पूर्व वेवूर येथील मस्तांग इंटरप्राइजेस या कंपनीतील कामगारांना  पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याने मंगळवारी आंदोलन करणाऱ्या कामगारांनी कंपनीच्या मालकिणीची कार बोलण्याकरिता थांबविली. त्यामुळे संतप्त झालेल्या कंपनी मालकीण नाजनीन कात्रक यांनी  कामगारांच्या अंगावर  कार घातली. मंगळवारी घडलेल्या घटनेत विद्या यादव (२७) ही कामगार महिला जखमी झाली. 

पालघर पूर्व येथील  मस्तांग इंटरप्राइजेस ही सॉक्स  बनवणारी कंपनी असून, या कंपनीत  वर्षांपासून काम करणाऱ्या  ४५ कामगारांना ८ तासांऐवजी १२ तास काम करावे लागेल, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी महिलांना दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत काम करण्याच्या सूचना दिल्यावर कामगारांनी विरोध दर्शविला. त्यामुळे रविवारपासून गेटवर असताना कंपनीने ४५   कामगारांना कामावर हजर करून घेण्यास नकार दिला. पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्याबाबत कंपनी व्यवस्थापकाला फोन करून विचारले असता व्यवस्थापकाकडून मज्जाव केल्याचे सांगितले.  

असा घडला प्रकारकामगार कंपनीसमोर व्यवस्थापनाशी बोलण्यासाठी एकत्र जमले होते. यावेळी कंपनीतून कारमधून कंपनी मालक नाजनीन  या बाहेर जात होत्या.  कार थांबविल्याने संतप्त झालेल्या नाजनीन  यांनी ड्रायव्हरला खाली उतरायला सांगून कारचा ताबा घेतला. 

त्यानंतर कामगारांच्या अंगावर कार घातली.  यामध्ये विद्या रामकुमारी  यांच्या पायावरून गाडी नेल्याने ती जखमी झाली. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. 

जबाब घेण्याचे काम सुरूया प्रकरणात उशिरापर्यंत जाब जबाब घेण्याचे काम सुरू असून,  गुन्हा दाखल झाला नसल्याचे पालघर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी ‘ सांगितले. मस्तांग कंपनीच्या नाजनीन  यांच्याशी संपर्क साधण्यासाठी कंपनीत गेले असता कंपनी मालक आल्यानंतर  संपर्क साधला जाईल, असे कंपनीतील सुरक्षारक्षकांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :carकारpalgharपालघर