शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

11 ची ‘डेडलाइन’ पाळताना व्यापारी, नागरिकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 00:17 IST

दुपारी १ वाजेपर्यंत वेळ वाढविण्याची केली आहे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोना रुग्णांची वाढती संख्या थोपविण्यासाठी सकाळी ७ ते ११ वाजेची ‘डेडलाइन’ पाळण्यासाठी किराणा माल आणि भाजी विक्रेत्यांसह ते खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यामध्ये आणखी किमान दोन तासांची वाढ करून ती दुपारी १ वाजेपर्यंत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्याचबरोबर मृत्यूंचीही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने गेल्या काही दिवसांपासून अधिक कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त किराणा आणि भाजी विक्रेत्यांना सकाळी ११ पर्यंतची वेळ दिली आहे. या वेळेचे काटेकोर पालन करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे सकाळी १०.३० ते ११ वाजेपर्यंत पोलिसांची वाहने ध्वनिक्षेपकावरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत असतात. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून किंवा कारवाईच्या भीतीने ११ पर्यंत ही सर्व दुकाने बंद होतात; परंतु मासळी, तसेच अनेक विक्रेत्यांना सकाळी ९ ते १० पर्यंत माल मुंबईतून आणल्यानंतर विक्रीसाठी अवघा एक ते दोन तासांचा अवधी मिळतो. त्यामुळे या विक्रेत्यांची दमछाक होते. त्याचवेळी ग्राहकांनाही सकाळी ११ नंतर किराणा किंवा भाजी मिळत नसल्यामुळे त्यांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यामुळे ही वेळ आणखी एक ते दोन तासांनी वाढवून द्यावी, अशी मागणी विक्रेते, तसेच ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.

नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगानियम न पाळणाऱ्या विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा पालिका आणि पोलिसांकडून उगारला जात आहे. त्यातच त्यांना कोरोना चाचणीही आवश्यक केल्यामुळे ती करण्यासाठी या व्यापाऱ्यांची मोठी कसरत होत आहे. त्यासाठीही आणखी मुदतवाढ मिळावी, असाही सूर जांभळीनाका आणि वागळे इस्टेट येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळी मासळी किंवा इतर माल खरेदीसाठी पहाटे मुंबईत जावे लागते. ते घेऊन येईपर्यंत सकाळी ९ ते ९.३० होतात. मग विक्रीसाठी मिळणारा अवधी अगदी अल्प आहे. यात वाढ करण्यात यावी.- सीमा कोळी, मासळी विक्रेती, ठाणे.

मी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत आहे. रात्री उशिरा रुग्णालयातून आल्यानंतर सकाळी घरातील कामे उरकून पुन्हा रुग्णालयात जाण्याची धावपळ असते. त्यात सकाळी ११ पर्यंतच किराणा आणि भाजी विक्री सुरू असल्यामुळे ती खरेदीसाठी मोठी कसरत होते.- एक परिचारिका, ठाणे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या