शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मेरीटाइम हलगर्जीचा मच्छीमारांना फटका

By admin | Updated: August 13, 2015 23:10 IST

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा फटका सातपाटीच्या मासेमारी व्यवसायाला बसत असून दोन महिन्यांच्या पावसाळी बंदीनंतर पहिल्याच ट्रीपसाठी

पालघर : महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा फटका सातपाटीच्या मासेमारी व्यवसायाला बसत असून दोन महिन्यांच्या पावसाळी बंदीनंतर पहिल्याच ट्रीपसाठी समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या किशोर आ. मेहेर यांची ‘नारायणी’ ही बोट नौकायन मार्गावरील खडकावर बुधवारी धडकली. यामध्ये बोटीचे मोठे नुकसान होऊन जीवितहानी टळली.सातपाटी हे एक प्रगतिशील बंदर असून पालघर जिल्ह्यातून सर्वात जास्त मत्स्य उत्पादनाची (कोट्यवधी रुपये) उलाढाल दोन सहकारी संस्थांमार्फत करण्यात येते. यातून लाखो रु.चे परकीय चलन शासनाकडे जमा होत असते. मात्र, ८ ते १० वर्षांपासून सातपाटीची खाडी गाळाने भरली असून मच्छीमारांपुढे अनेक समस्या निर्माण होत आहेत. सातपाटी खाडीच्या नौकानयन मार्गात अनेक सॅण्डबार व खडक निर्माण झाले असून खाडीमध्ये उंच वाळूची पठारे निर्माण झाली आहेत. त्यामुळे मासेमारीला जाण्यासाठी मच्छीमारांना मोठ्या उधाणाची वाट पाहावी लागते. परिणामी, मासेमारीचे दिवस वाया जात मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. या समस्येवर उपाययोजना आखावी म्हणून मच्छीमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्था अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत आहे.पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली ११ आॅगस्ट रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित बांगर, कृती समिती सरचिटणीस नरेंद्र पाटील, मच्छीमार संस्थेचे चेअरमन राजन मेहेर, आ. विलास तरे, आ. पास्कल धनारे, जि.प. उपाध्यक्ष सचिन पाटील, सभापती अशोक वडे, ज्योती मेहेर, बविआचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील इ. सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये निधी उपलब्ध असतानाही तो वापरला जात नसल्याने पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे येत्या पाच दिवसांत आपण खाडीतील गाळ काढण्याच्या कामाला तत्काळ सुरुवात करणार असल्याचे आश्वासन मेरीटाइमचे अभियंते देवरे यांनी दिल्याचे राजन मेहेर यांनी सांगितले. अशी अनेक आश्वासने आतापर्यंत देवरे यांनी मच्छीमारांना दिली असून त्यांच्या दुर्लक्षामुळे सातपाटी खाडीतील समस्यांवर उपाययोजना केल्या जात नसल्याने काल दुपारी धोकादायक खडकाजवळ कुठलेही गाइड पोल उभारले गेले नसल्याने किशोर मेहेर यांची बोट खडकावर आदळली. या वेळी रत्नाकर मेहेर यांच्यासह त्याच्या बोटींनी तत्काळ मदत पोहोचवली नसती तर प्राणहानीसह मोठी वित्तहानीची घटना घडली असती. (वार्ताहर)