शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरारमध्ये बत्ती गुल

By admin | Updated: July 15, 2015 23:45 IST

वसई-विरार परिसरात वीज वितरण व्यवस्थेचा खेळखंडोबा अद्याप थांबलेला नाही. मंगळवारी या दोन्ही परिसरात सुमारे २२ तास वीजपुरवठा खंडीत झाला होता.

वसई : वसई-विरार परिसरात वीज वितरण व्यवस्थेचा खेळखंडोबा अद्याप थांबलेला नाही. मंगळवारी या दोन्ही परिसरात सुमारे २२ तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. विरार पश्चिम भागात सकाळी गेलेली वीज सायंकाळी ७ वाजता आली तर पूर्व भागात रात्री १२ वाजता गेलेली वीज सकाळी ७ वाजता आली. वीज खंडीत होण्यामागची कारणे एकाही कार्यालयाकडून कळू शक ले नाहीत.गेला महिन्या भरा पासून वसई विरार भागात सतत वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरीक कंटाळले आहेत तर दुसरीकडे शासकीय कार्यालये, शाळा, हॉस्पिटल आदींवर परिणाम जाणवू लागला आहे. दोन आठवड्यापुर्वी सतत खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे बोळींज येथे गावकरी रस्त्यावर उतरले होते. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.या संदर्भात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई उपविभागाचे अधिक्षक अभियंता सोनावणे यांच्याशी संपर्क साधून त्वरीत कार्यवाही करा अन्यथ: उद्रेक होण्याची शक्यता आहे असे कळवले होते. त्यानंतरही वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा झाली नाही. उलट वीज खंडीत होण्याच्या प्रकारामध्ये वाढ होत गेली. नालासोपारा येथे खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नगरसेवकांनी एकत्र येऊन अधिक्षक अभियंता कार्यालयावर हल्लाबोल केला होता. परंतु त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही.सहा दिवस मेट गाव अंधारातवाडा तालुक्यातील मेट येथे असलेल्या विद्युत राहित्रात बिघाड झाल्याने मेट या गावपाड्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. महावितरणला कळवून सुद्धा वीज न आल्याने गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीची पाणी योजना बंद असून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणी अशुद्ध असल्याने साथीचे आजार होण्याची भीती गावकरी व्यक्त करीत आहेत.