शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी टिपेला

By admin | Updated: April 15, 2016 01:08 IST

या तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून उमेदवार आपले पॅनल घेऊन मतदारांच्या घरी त्यांची मनधरणी करतांना व आश्वासनांची

विक्रमगड : या तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून उमेदवार आपले पॅनल घेऊन मतदारांच्या घरी त्यांची मनधरणी करतांना व आश्वासनांची खैरात करतांना दिसत आहेत़ सर्वच राजकीय पक्षांनी परंपरागतपणे राजकीय व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे़ मात्र या निवडणुकांत विक्रमगड तालुक्यातील विक्रमगढ शहर वगळता ३५ ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवणुकापैकी २० ग्रामपंचायतीवर ५० टक्के महिला आरक्षण असल्याने या आदिवासी गाव पाडयातील अनुसूचित जमातीच्या महिला सरपंचपदी विराजमान होणार आहेत़ या निवणुकांसाठी एकुण ६८ हजार २८६ मतदार आपला मतदाचा हक्क बजावणार आहेत़ त्यामध्ये पुरुषांच्या ३५०६५ तर महिलांची संख्या ३३,२०३ याप्रमाणे असल्याची माहिती निवासी तहसिलदार आयुब तांबोळी यांनी दिली़तालक्यात ३९ ग्रामपंचायती असून त्यापैकी ३५ ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपत आला असल्याने त्यांच्या निवडणुका होत आहेत़ ३५ ग्रामपंचायतीच्या ३७६ जागांसाठी ११७६ अर्ज दाखल केले होते़ छाननीत २७ अर्ज अवैध ठरविण्यात आले, तर २९३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ७९३ रिंगणात आहेत़ नगरपंचायतीच्या मुददयावर विक्रमगडकरांनी बहिष्कार टाकल्याने आता ३५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेयेथील दऱ्या-खोऱ्यातील आदिवासी त्याच हालअपेष्टांमध्ये जीवन जगत आहे़ गावात त्यांना जगण्यासाठी रोजगार नसल्याने पावसाळा संपताच ८ महिने ते कामाच्या शोधार्थ शहरांत आपली मायभूमी सोडून स्थलांतर करीत आहेत़ तसेच रस्ते, शिक्षण, निवारा, शेतमालाला हमी भाव नाही, औदयोगीक वसाहतींचा अभाव, पाणी वीज सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता पुरविण्याबाबत लोकप्रतिनिधींना अपयश आलेले आहे़ या भागात मतदार आदिवासी समाजाचे प्राबल्य जास्त आहे़ परंतु जव्हार मोखाडा व विक्रमगड हे भागत काल आज व उदयाही विकासापासुन दुर्लक्षीत आहेत व राहाणार आहे कुणी काही करणार नाही असे आतापर्यतची परंपरा सांगते आहे. त्यामुळे विक्रमगड तालुक्यातील गाव-खेडयातील काही भागातील मतदार नोटाचा वापर करणार असे सांगत आहेत़ विक्रमगड तालुक्याच्या निर्मीतीपासून येथील आदिवासींच्या नावाने कोटयावधी रुपये कागदोपत्री खर्च होतांना दिसत आहेत परंतु गेल्या ६६ वर्षात या भागाचा विकास करणारा सक्षम लोकप्रतिनिधी अजून या भागाला लाभलेला नाही.या निवडणुकांसाठी भाजपा, माकपा, शिवसेना, राष्ट्वादी, कॉगे्रस, बहुजन विकास आघाडी,•भारिप, आमदामी पार्टी, आदी ७९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने चुरशीची अशी पंचरंगी लढत होत आहे़ मात्र खरी लढत ही गतवर्षीप्रमाणेच भाजपा, बहुजन विकास आघाडी व माकपा यांचेमध्ये अपेक्षित असल्याचे जाणकांराकडून सांगण्यात येते़ आता प्रचाराचा अंतीम टप्पा असल्याने प्रत्येक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते, मोटर सायकल रॅली, तसेच मतदारांच्या घरी गल्ली-बोळातून फिरतांना दिसत आहेत़ त्यामुळे सर्वच परिसर प्रचारमय झालेला आहे.