शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
6
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
7
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
8
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
9
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
10
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
11
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
12
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
13
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
14
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
15
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
16
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
17
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
18
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
19
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
20
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
Daily Top 2Weekly Top 5

विरार इमारत दुर्घटनाप्रकरणी आणखी चौघांना अटक; जागा मालकाचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 15:07 IST

विरारमधील रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनेप्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : विरारमधील रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनेप्रकरणी नीतल साने (४८) या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी ४ जणांना अटक केली. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. आरोपी हे विकासक आणि जागामालक आहेत. 

मंगळवारी विरारच्या नारिंगी येथे रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळली. त्यात १७ जणांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले. याप्रकरणी विकासक नीतल साने (४८) याला अटक केल्यावर तपास गुन्हे शाखा ३ कडे सोपविला. जागामालक परशुराम दळवी आणि विकासक नीतल साने यांच्यात करारनामा झाला होता. दरम्यान, परशुराम दळवी याचे निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या दोन मुली आणि जावयांनी पुढील बांधकामाची प्रक्रिया केली. २००८ ते २०११ या कालावधीत बांधकाम झाले. 

ते तिघे कोण?
शुक्रवारी गुन्हे शाखेने शुभांगी भोईर (३८), संध्या पाटील (३५) तसेच जावई सुरेंद्र भोईर (४६) आणि मंगेश पाटील (३५) यांना अटक केली आहे. त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली तर विकासक नीतल साने याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची वाढीव पोलिस कोठडी देण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखा २चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाहूराज रणावरे यांनी दिली. ही इमारत बेकायदेशीरपणे बांधली होती. २०२० मध्ये पालिकेने दुरुस्तीची नोटीस बजावली होती. मात्र, विकासक आणि जागामालक यांनी काहीच उपाययोजना केली नव्हती.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र