शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी, पूरग्रस्तांना मिळणार आठवडाभरात नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:24 IST

शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी २५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जिल्हा महसूल विभागामार्फत शासनाकडे मागणी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यातील १८ कोटी ०४ लाख ०९ हजर रुपये शेतकऱ्यांना तहसीलदारांमार्फत या आठवड्यात वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

जिल्ह्यातील जून ते ऑक्टोबर-दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे ६२ हजार ७९८ शेतकऱ्यांचे २५ हजार ५८०.६६ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले होते. या आपद्ग्रस्तांना शासनाच्या शेतपिकासाठी जिरायत आश्वासित सिंचनाखालील पिके याअंतर्गत यापूर्वी शासनामार्फत ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्‍टर इतकी तरतूद होती. त्यामध्ये ९ नोव्हेंबर २०२० रोजी शासन निर्णयान्वये ३ हजार २०० रुपये प्रति हेक्‍टर वाढ होऊन एकूण १० हजार रुपये प्रति हेक्‍टर करण्यात आली आहे. बहुवर्षीय पिकासाठी यापूर्वी १८ हजार प्रति हेक्टरी इतकी तरतूद होती. त्यामध्ये ९ नोव्हेंबर २०२० रोजी ७ हजार रुपये प्रति हेक्टरी वाढ करून एकूण २५ हजार प्रति हेक्टर शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करण्याबाबत आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.

अनुदान वाटप करण्याचे तहसीलदारांना आदेशn जिल्ह्यासाठी एकूण २५ कोटी ५८ लाख ५२ हजार रुपये अनुदानाची गरज होती. त्यापैकी ९ नोव्हेंबर रोजी ७ कोटी ५४ लाख ४३ हजार अनुदान महसूल व वन विभाग मदत व पुनर्वसन अंतर्गत यांच्याकडून प्राप्त झाले होते. त्याचे वाटप संबंधित तहसीलदारामार्फत बाधित शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. n शासनाकडून ७ जानेवारी २०२१ रोजीच्या आदेशान्वये उर्वरित संपूर्ण रक्कम १८ कोटी ०४ लाख ०९ हजार अनुदान महसूल व वन विभागाच्या मदत व पुनर्वसन अंतर्गत प्राप्त झाली आहे. हे अनुदान तहसीलदारांना वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार