शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीला भरावाचा फटका

By admin | Updated: December 24, 2014 22:37 IST

: जेएनपीटी बंदराच्या अखत्यारीतील डी.पी. वर्ल्डनजीक चालू असणाऱ्या ३३० मीटरच्या नव्या जेटीच्या भरावांमुळे न्हावा, न्हावा खाडी आणि गव्हाण परिसरातील मासेमारी बाधित होत आहे.

उरण : जेएनपीटी बंदराच्या अखत्यारीतील डी.पी. वर्ल्डनजीक चालू असणाऱ्या ३३० मीटरच्या नव्या जेटीच्या भरावांमुळे न्हावा, न्हावा खाडी आणि गव्हाण परिसरातील मासेमारी बाधित होत आहे. त्यामुळे हजारो स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी येत्या सोमवारी उरणच्या करळ फाट्यावर रास्ता रोको करण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला आहे. या आंदोलनाबाबत जेएनपीटी प्रशासनाला १५ डिसेंबरलाच निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. उरणच्या जेएनपीटी बंदराच्या विस्तारीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. हे काम करताना केवळ मासेमारीवर उदरनिर्वाह असणाऱ्या न्हावा, न्हावा खाडी आणि गव्हाण परिसरातील मासेमारांना आणि स्थानिकांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई जेएनपीटीने जाहीर केलेली नाही. न्हावा गाव आणि न्हावे खाडी गावातील ९० कुटुंबांचा आणि त्यावर आधारित नागरिकांच्या मासेमारी होड्या असून त्याद्वारे याच समुद्र किनाऱ्यावर मासेमारी केली जाते. गाव परिसरातील ४० टक्के लोकांचा खाजणी मासळी पकडण्याचा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे हाताने निवटे ढोसणे, कालवं काढणे, फळीवर जाऊन किळशी, वाव पकडणे आदी प्रकारची मासेमारी ही येथील नागरिकांकडून केली जाते. ४५ कुटुंबे कालवं निर्माणाचे दगडी बंधारे याच समुद्र किनाऱ्यावर करीत आहेत. मासेमारीशी संबंधित या सर्व व्यवसायांवर भरावामुळे परिणाम होत आहे. येथील नागरिकांना विस्तारित जेट्टीवर नोकऱ्या देण्यात प्राधान्य देण्याबरोबरच मासेमारांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला, कालवं निर्माणासाठीच्या बंधाऱ्याच्या मालकांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देण्यात यावा त्याचबरोबर स्थानिकांना न्हावा ते घारापुरी या प्रवासाकरिता न्हावा गावाजवळ सुसज्ज जेट्टी उभारुन द्यावी, अशी मागणी न्हावा ग्रामसुधारणा मंडळाने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत त्वरित पावले न उचलल्यास २९ डिसेंबरला रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.करळ फाट्यावर रास्ता रोको करण्याची जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी न्हावा आणि न्हावा खाडी गावात नागरिकांनी शंभर टक्के आंदोलनात उतरावे यासाठी गावबैठका घेण्यात येत असून या बैठकांनाही जोरदार पाठिंबा मिळत आहे.