शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 00:46 IST

कलिंगड उत्पादकांत चिंतेचे  वातावरण

- वसंत भोईरलोकमत न्यूज नेटवर्क वाडा : या वर्षी कोरोना मारामारीचे संकट, अवकाळी पाऊस पडल्याने भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याही परिस्थितीत स्वतःला  सावरत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कलिंगड शेती केली असून पीकही बहरून आले आहे,  मात्र या पिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नाही तसेच मालाच्या साठवणुकीसाठी गोडावून उपलब्ध नसल्याचा फायदा व्यापारी उठवत आहेत. त्यातच कोरोनाने परत डोके वर काढल्याने पुन्हा लाॅकडाऊन होण्याची भीती व्यापारी शेतकऱ्यांना दाखवत असून माल खरेदीसाठी येतच नाहीत. यामुळे बहरून आलेले कलिंगडचे उत्पादन कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. 

 वाडा तालुक्यात भाताखालोखाल कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये वाल, तूर, मूग, हरभरा, तीळ, उडीद, मटकी, चवळी, धणे, राई आदी रब्बी पिके घेतली जातात. परंतु या वर्षी हवामान बदलाचा फटका रब्बी पिकांना बसल्याने ही पिकेही शेतकऱ्यांच्या हातून गेलेलीच आहेत. यातून सावरण्यासाठी कर्जे काढून भाजीपाला, कलिंगड, टरबूज, पपई ही फळशेती करण्याचा प्रयत्न करून भातशेती, रब्बी पिकांतून झालेली हानी भरून काढण्याचा प्रयत्न येथील शेतकरी करू पाहत होता. कलिंगडचे पीकही बहरून आले आहे. मात्र खरेदी करणारे व्यापारी फिरकतच नसल्याने मातीमोल किमतीत कलिंगडची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने बळीराजा मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाचा लहरीपणा व कोरोना मारामारीचे संकट यावर मात करून येथील शेतकऱ्यांनी कलिंगडची उत्तम शेती केली आहे. पीकही बहरून आले आहे, मात्र योग्य दराने विक्री होत नसल्याची खंत येथील शेतकरी प्रकाश पष्टे यांनी व्यक्त केली.

कलिंगड खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पुन्हा  लाॅकडाऊन होणार असल्याची भीती कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना दाखवली जात आहे. यामुळे या उत्पादनातून झालेला खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कलिंगड शेतीसाठी मी दीड लाख रुपये कर्ज घेतले आहे. त्या कर्जाचा बोजा डोक्यावर चढणार असून घेतलेले कर्ज फेडणार कसे? व संसाराचे रहाटगाडगे हाकणार कसे? ही समस्या उभी राहिली आहे.- अरुण पष्टे, कलिंगड उत्पादक शेतकरी, डोंगस्ते