शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

‘एम मित्र’ योजनेचा लवकरच विस्तार

By admin | Updated: October 17, 2014 01:18 IST

सायन रुग्णालयात दीड वर्षापूर्वी गर्भवतींसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेला ‘एम मित्र’ (मोबाइल मित्र) हा उपक्रम लवकरच मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये राबवण्यात येणार आहे.

पूजा दामले - मुंबई
सायन रुग्णालयात दीड वर्षापूर्वी गर्भवतींसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेला ‘एम मित्र’ (मोबाइल मित्र) हा उपक्रम लवकरच मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तीन रुग्णालये आणि 6 स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘एम मित्र’मध्ये 2 हजार 3क्क् गर्भवतींची नोंद झाली आहे. 
गर्भवतींनी कोणती काळजी घ्यावी, त्यांचा आहार कसा असावा, कितव्या महिन्यात कोणत्या तपासण्या कराव्यात, मूल जन्माला आल्यावर 1 वर्षाचे होईर्पयत त्याचे संगोपन कसे करावे, याची शास्त्रशुद्ध माहिती प्रत्येक गर्भवतीर्पयत पोहोचावी, या हेतूने ही सुविधा सुरू करण्यात आली होती. सायन रुग्णालयामध्ये आतार्पयत 3 हजार गर्भवतींची नावे ‘एम मित्र’मध्ये नोंदवण्यात आली आहेत. यूएसच्या ‘मोबाइल अलायन्स फॉर मॅटर्नल अॅक्शन’ने (मामा) दिलेल्या  निधीतून ‘एम मित्र’चा विस्तार संपूर्ण मुंबईत करण्यात येणार आहे, असे ‘एम मित्र’च्या रिसर्च अॅण्ड स्ट्रॅटेजी कमिटीच्या प्रमुख प्रेरणा कुमार यांनी सांगितले. 
धारावी येथील मिनी सायन रुग्णालय, मालाड मालवणी येथील सामान्य रुग्णालय आणि अंधेरीचे बीएसीएस या तीन रुग्णालयांत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाचा विस्तार करताना मुंबईतल्या रुग्णालयांशी चर्चा करून सर्व रुग्णालयांमधून गर्भवतींची नोंद केली जाणार आहे. याचबरोबरीने अंगणवाडय़ांमधून आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनेदेखील महिलांच्या नावांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे प्रेरणा यांनी सांगितले.
 
च्गर्भवतींनी कोणती काळजी घ्यावी, त्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांचा आहार कसा असवा, मूल जन्मल्यानंतर 1 वर्षाचे होईर्पयत त्याचे संगोपन कसे करावे, याची सर्व माहिती एका रेकॉर्डेड मेसेजमार्फत दिली जाते. 
 
च्बाळ जन्माला आल्यावर पहिल्या आठवडय़ात रोज एक मेसेज पाठवला जातो. एका आठवडय़ानंतर तीन महिन्यांर्पयत आठवडय़ातून दोनदा मेसेज पाठवला जातो. तर तीन महिन्यांनंतर एक वर्षार्पयत आठवडय़ातून एक मेसेज पाठवला जातो. 
 
च्गर्भवती तपासणीसाठी रुग्णालयात गेल्यावर ‘एम मित्र’तर्फे तिची सर्व माहिती घेतली जाते. तिचा मोबाइल क्रमांक घेतला जातो. तिला कितवा महिना सुरू आहे, हे विचारले जात़े तिला कोणत्या वेळेत आणि कोणत्या भाषेत हा रेकॉर्डेड मेसेज पाठवायचा, याची माहिती घेतली जाते. यानंतर त्या महिलेला आठवडय़ाला दोन वेळा हा मेसेज पाठवण्यात येतो.