शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

एक्झिबिशन सेंटरसाठी ठेकेदारच मिळेना!

By admin | Updated: December 18, 2014 23:41 IST

शहराच्या लौकिकात भर घालणाऱ्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटरच्या देखभालीसाठी एकही ठेकेदार पुढे येत नसल्याने ही जबाबदारी सध्या सिडकोलाच पार पाडावी लागत आहे

नवी मुंबई : शहराच्या लौकिकात भर घालणाऱ्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटरच्या देखभालीसाठी एकही ठेकेदार पुढे येत नसल्याने ही जबाबदारी सध्या सिडकोलाच पार पाडावी लागत आहे. सिडकोकडून या सेंटरची म्हणावी तशी देखरेख होत नाही. त्यामुळे अत्याधुनिक दर्जाच्या या वास्तूला घरघर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिडकोच्या वतीने वाशी रेल्वे स्थानकाजवळ ७.४ हेक्टर जागेवर हे अत्याधुनिक एक्झिबिशन सेंटर उभारण्यात आले आहे. ग्रीन बिल्डिंग म्हणून ही वास्तू ओळखली जाते. यात दोन मोठी प्रदर्शन केंद्रे, मीटिंग रूम, कॅफे, फूड कोर्ट आदी अत्याधुनिक सुविधा आहेत. शिवाय एकाच वेळी ४५० वाहने पार्क करता येतील इतके मोठे वाहनतळ आहे. या एक्झिबिशन सेंटरच्या देखभालीसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी रीतसर निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता पुन्हा दुसऱ्यांदा सुधारित निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ठेकेदार संस्थेची निवड होईपर्यंत या वास्तूची देखभाल सिडकोच्या माध्यमातूनच केली जाईल, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी स्पष्ट केले आहे.सिडकोचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वास्तूचे जुलैमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. मात्र उद्घाटनानंतर गेल्या साडेचार महिन्यांत या वास्तूत केवळ दोनच कार्यक्रम पार पडले आहेत. आयोजकांना आकर्षित करण्यात सिडकोला अपयश येत असल्याने, शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाची ही वास्तू वापराविना पडून असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)