शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पालघरात डॉक्टरांचा मूक मोर्चा

By admin | Updated: March 22, 2017 01:18 IST

राज्यातील निवासी डॉक्टरावरील वाढत्या हल्ल्याच्या त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यांना सुरक्षा पुरविण्यास

पालघर : राज्यातील निवासी डॉक्टरावरील वाढत्या हल्ल्याच्या त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यांना सुरक्षा पुरविण्यास शासन अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर’ डॉक्टर वाचला तर रुग्ण वाचेल या स्लोगन घेऊन मूक मोर्चा काढण्यात आला.मागील दोन वर्षात डॉक्टरावरील हल्ल्याच्या ४५ घटना घडल्याअसून ह्या प्रकरणाची पोलिसात तक्रार नोंदवूनही आरोपीवर अजून कारवाई झालेली नाही. रु ग्णालये, आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची नेमणूक करू असे, आश्वासन देऊन दोन वर्षे झाली मात्र अजूनही त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे डॉक्टरांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे.त्यामुळे धुळ्यासह इतर भागातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करणे,कायद्याची कठोरपणे अमलबजावणी करणे, सर्वामध्ये जनजागृती करणे, हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी एक परिपूर्ण यंत्रणा उभारणे, शासकीय रु ग्णालयातील डॉक्टर व डॉक्टरेतर कर्मचारांचे संरक्षण करण्यासाठी यंत्रणा उभारणे, डॉक्टर संरक्षण कायदा २०१० ची परिणामकारक प्रभावी अंमलबजावणी करावी, या कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या आरोपींवरील खटल्याची जलद न्यायालयामार्फत सुनावणी व्हावी या मागण्या करणारे निवेदन देण्यात आले. मंगळवारी सकाळी १० वाजता पालघर रेल्वे स्टेशन येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. त्यात वसई ते डहाणू दरम्यानच्या सर्व पॅथीचे डॉक्टर्स, हॉस्पिटल स्टाफ, नर्सेस, लॅब मालक-स्टाफ, अ‍ॅम्बुलन्स चालक, मेडिकल स्टोअर चालक सहभागी झाले होते. हा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी अडविल्या नंतर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष संखे, उपाध्यक्ष डॉ. दिपक शाह, सचिव डॉ. रत्नाकर माने,डॉ.प्रकाश गुडसुरकार, डॉ.हेमराज करवीर, डॉ.सूर्यराज संखे,डॉ.उमेश डुंम्पलवार,डॉ.भार्गव ठाकूर,डॉ.कंपली आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट घेऊन चर्चा केली.(वार्ताहर)