शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हयात प्रमाणपत्रासाठी निराधारांची कोरोनाकाळात बँकांसमोर होतेय गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 00:40 IST

प्रतिमाह १ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जात आहे. दरवर्षी या लाभार्थीना हयात प्रमाणपत्र बँकेला सादर करावे लागत असते.

हुसेन मेमनलोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यातील आदिवासी आणि इतर समाजातील निराधारांना राज्य शासनाकडून पेन्शन मिळत असते. त्यावर कशीबशी या व्यक्ती गुजराण करीत आहेत. जानेवारीपासून ते मार्चपर्यंत आपले हयात प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी श्रावण बाळ, संजय गांधी निराधार आणि इंदिरा गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना आपापले हयात प्रमाणपत्र तहसील कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. परंतु हयात प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोरोना काळ असूनदेखील, शहरातील स्टेट बँक, महाराष्ट्र बँकेसमोर या लाभार्थ्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. 

प्रतिमाह १ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जात आहे. दरवर्षी या लाभार्थीना हयात प्रमाणपत्र बँकेला सादर करावे लागत असते. हयातीचा दाखला मिळविण्यासाठी कोरोना काळातही या निराधार लाभार्थ्यांच्या लांबच लांब रांगा शहरातील बँकेसमोर लागत आहेत. त्यामुळे एकीकडे शासन, प्रशासन कोरोना काळात ज्येष्ठांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करीत आहे; तर दुसरीकडे या योजनांचा लाभ घेऊन आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी हे निराधार जीव धोक्यात घालत आहेत. यासाठी बँक प्रशासनाकडून कोणतीच खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे या निराधारांची ससेहोलपट सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता ज्येष्ठांनी या वयात घराबाहेर पडणे टाळणे गरजेचे असताना त्यांना घराबाहेर पडून बँकेच्या दारात गर्दीत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने कोरोना काळात या निराधार लाभार्थ्यांना हयात दाखला घरपोच देण्यासाठी प्रयत्न करावेत. बँक व तालुका प्रशासनाच्या समन्वयातून निराधार लाभार्थ्यांच्या हयात प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

कोरोनाबाबतची व्यवस्था बँकांमध्ये अपुरी  ज्येष्ठांना साथरोगाच्या काळात काळजी घ्यावी लागते. बाधित होण्याचे प्रमाण ज्येष्ठांमध्ये अधिक आहे. बँकांकडून सॅनिटायझरची व्यवस्था अपुरी पडत आहे. तसेच ऑनलाइन प्रमाणपत्र नाही त्यांनी तहसील कार्यालयातून लेखी पत्र दिल्यास बँकांकडून अनुदान दिले जाते.  

नियम पाळण्यात लोकांमध्ये बेफिकिरीलाभार्थ्यांनी जास्तीत जास्त ऑनलाइन प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. निराधारांना ते शक्य होत नाही. तसेच बँकांसमोर होत असलेल्या गर्दीमध्ये अनेक जण मास्कबाबत बेफिकीर असल्याचेही दिसते.