सोनसाखळी चोरास जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश; ४ गुन्ह्यांची उकल, लाखोंचे ७३ ग्रॅम सोने केले हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 06:44 PM2024-02-05T18:44:12+5:302024-02-05T18:44:40+5:30

विरारच्या यशवंत हाईट्स येथे राहणाऱ्या ज्योती जैन (२८) या महिलेच्या गळ्यातून २५ जानेवारीला रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्या दुचाकीवरून घरी जात असताना सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना घडली होती.

Crime Branch succeeded in imprisoning the gold chain thief; 4 crimes solved, 73 grams of gold worth lakhs seized | सोनसाखळी चोरास जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश; ४ गुन्ह्यांची उकल, लाखोंचे ७३ ग्रॅम सोने केले हस्तगत

सोनसाखळी चोरास जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश; ४ गुन्ह्यांची उकल, लाखोंचे ७३ ग्रॅम सोने केले हस्तगत

मंगेश कराळे -

नालासोपारा - सोनसाखळी चोरास जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या आरोपीकडून ४ गुन्ह्यांची उकल करून ४ लाख ३८ हजारांचे ७३ ग्रॅम सोने हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.

विरारच्या यशवंत हाईट्स येथे राहणाऱ्या ज्योती जैन (२८) या महिलेच्या गळ्यातून २५ जानेवारीला रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्या दुचाकीवरून घरी जात असताना सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना घडली होती. त्या जुन्या विवा कॉलेज समोरील रिलायन्स मार्टजवळ आल्यावर त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील चोरट्याने त्यांच्या गळ्यातून ९५ हजारांचे साडे सतरा ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचुन जकात नाक्याकडे पळून गेला होता. विरार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या विरार, अर्नाळा, नालासोपारा परिसरात गेल्या काही महिन्यापासुन रस्त्यावरुन वाहन चालवणाऱ्या महिलांचे गळ्यातून मंगळसूत्र, सोन्याची चेन जबरीने चोरून नेण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले होते. सदर घटनांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेऊन आरोपींचा शोध घेवुन पायबंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या. 

सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडे देण्यात आला. गुन्हे शाखेने वेगवेगळे पोलीस पथक तयार करुन आयुक्तालय परिसरात घडणारे चेन स्नॅचिंगचे विविध गुन्हयाचे अवलोकन करुन आरोपीने गुन्हयात वापरलेले वाहन तसेच आरोपी याची गुन्हे करण्याची पद्धतीवरुन त्याची माहिती मिळवली. आरोपी अमित नमू शनवार (२८) याला गुन्हयात वापरलेली दुचाकी व हेल्मेटसह ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास करत पोलीस कोठडी दरम्यान एक सोन्याची चेन व सोन्याची लगड असा ७३ ग्रॅम ५०० मिली वजनाचा ४ लाख ३८ हजार २०० रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीकडून पोलीस कोठडी दरम्यान ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे, सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.
 

 

Web Title: Crime Branch succeeded in imprisoning the gold chain thief; 4 crimes solved, 73 grams of gold worth lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.