शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कार्यालयावर नगरसेवकांचा मोर्चा

By admin | Updated: July 7, 2015 22:21 IST

गेल्या काही दिवसापासून वसई तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात महावितरणच्या कारभाराचा खेळखंडोबा झाला आहे. दररोज वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारामुळे नागरीक नगरसेवकांना जाब विचारु लागले आहेत.

वसई : गेल्या काही दिवसापासून वसई तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात महावितरणच्या कारभाराचा खेळखंडोबा झाला आहे. दररोज वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारामुळे नागरीक नगरसेवकांना जाब विचारु लागले आहेत. त्यामुळे आज नगरसेवकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. एकतर कारभार सुधारा नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.नालासोपारा शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून दर दोन तासाने वीजपुरवठा खंडीत होत आहे. या लपंडावा बाबत वारंवार तक्रारी करूनही महावितरणचा कारभार सुधारलेला नाही. या विरोधात नागरीकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. याप्रश्नी नगरसेवकांनी या प्रश्नी पाठपुरावा करावा यासाठी नागरीक गळ घालू लागले आहेत. आज माजी उपमहापौर रुपेश जाधव व अन्य सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित नगरसेवकांनी महावितरणला ९० कोटीचा आर्थिक निधी मिळूनही जुनाट साहित्य बदलण्याच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. तसेच भरमसाठ वीजबिल आकारणे व मीटर रिडींग न घेता बिले पाठवणे अशा प्रकारामुळे नागरीकांमध्ये असंतोष झाला असून कोणत्याही क्षणी आंदोलन होण्याच्या शक्यतेकडे त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी नगरसेवकांनी मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी लवकरचकार्यवाही करून वितरण व्यवस्थेत सुधारणा होईल असे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)