शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चैन पडेना आम्हाला...

By admin | Updated: October 11, 2016 02:28 IST

संपूर्ण राज्यासह पालघर जिल्ह्यात मागील दहा दिवसापासून अंबेमातेचा जागर आणि दांडियाची धूम उद्या पासून थांबणार असून आठ

पालघर : संपूर्ण राज्यासह पालघर जिल्ह्यात मागील दहा दिवसापासून अंबेमातेचा जागर आणि दांडियाची धूम उद्या पासून थांबणार असून आठ तालुक्यातील ८२० खाजगी आणि सार्वजनिक नवरात्रौ मंडळातील मुर्त्यांचे विसर्जन होणार आहे. हा विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा ह्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षिकेसह १ हजार ३४१ अधिकारी कर्मचारी, शीघ्र कृती डाळ,दंगल नियंत्रण पथक सज्ज झाले आहेत.१ आॅक्टोबर पासून नवरात्रोत्सवाला सुरवात झाल्यानंतर, दांडियाची सुरु असलेली धूम,पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी हल्ल्याचा दिलेला इशारा, ह्यामुळे ह्या सणावर दहशतवादाचे सावट राहिल्याने पालघर पोलीस प्रशासन सज्ज झाले होते.दहा दिवस पोलिसांनी डोळ्यात तेल घालून संशयास्पद गोंष्टीसह,गर्दी,वाहतूक,ई. वर बारकाईने लक्ष दिल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.उद्या दसऱ्याच्या सणा सह नवदुर्गा मातेच्या मुर्त्यांचे विसर्जन हि जिल्ह्यात होणार असल्याने हा सोहळा निर्विघ्नपने पार पडावा ह्या साठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.पालघरच्या पोलीस अधिक्षिका शारदा राऊत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली २ अप्पर पोलीस अधीक्षक, ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, १३६ पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक, ९५० पोलीस कर्मचारी, २५० होमगार्ड, राज्य राखीव पोलीस बलाची एक कंपनी, एक प्लाटून, शीघ्र कृती दलाचे एक प्लाटून,दंगल नियंत्रण पथकाचे दोन प्लाटून,अशी पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.उद्या दसरा असल्याने भाताची कणसे,आंब्याची पाने,झेंडूची फुले ह्यांनी बनविलेल्या तोरणा साठी,केळीचे खांब,हार,फुले,फळे ह्याच्या खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी जमली आहे. त्यामुळे ह्या सर्वांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.मात्र हिंदू समाज हा उत्सव प्रिय असल्याने खरेदी मध्ये कुठेही तडजोड होत असल्याचे दिसून आले नाही. भाताच्या कणसांची विक्री करण्यासाठी पालघरसह, केळवे, सफाळे, मनोर, बोईसर ई भागातील आदिवासी महिला पालघरच्या बाजारपेठे सह रस्त्या रस्त्यावर बसलेल्या दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)