शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग क्रिकेट संघाचे कर्णधार बनले ‘विशेष मतदार जागृती दूत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 23:56 IST

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत ‘विशेष मतदार जागृती दूत’ (डिस्ट्रिस्ट आयकॉन) म्हणून भारतीय दिव्यांग टी -२० वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार विक्रांत किणी यांची निवड झाली आहे.

पालघर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या मतदानात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत ‘विशेष मतदार जागृती दूत’ (डिस्ट्रिस्ट आयकॉन) म्हणून भारतीय दिव्यांग टी -२० वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार विक्रांत किणी यांची निवड झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी ही निवड केली आहे.अपंग मतदारांसाठी असलेल्या विशेष अ‍ॅपद्वारे नोंदणी केल्यास मतदान करताना त्यांना मदत उपलब्ध करून देण्यात येणार असून या कामी १८ वर्षाखालील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. विश्वचषक विजेता कर्णधार विक्र ांत किणी यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीने आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले असून आपल्या सहभागाने मतदारांमध्ये मतदानाकरिता जागृती निर्माण होण्यासाठी विशेष सहकार्य लाभणार आहे. याकरिता स्वीप अंतर्गत आपली डिस्ट्रिस्ट आयकॉन म्हणून निवड करण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी कर्णधार किणी यांना दिले आहे.मतदानासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे, यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात असून त्याचा सकारात्मक प्रतिसाद दिसून येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.एकूण २७६ मतदान केंद्रांत बदल करण्यात आला असून त्याची माहिती मतदारांपर्यंत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात येणार आहे.एकूण २१९३ मतदान केंद्रेकेंद्र अधिकाºयामार्फत (बीएलओ) १७ आॅक्टोबरपर्यंत सर्व मतदारांपर्यंत मतदान पावती पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात एकूण २१२० मूळ आणि ७३ सहाय्यकारी मतदान केंद्रे अशी एकूण २१९३ मतदान केंद्रे आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019