शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डीतील विवाहितेच्या आत्महत्येचे कोडे वाढले

By admin | Updated: March 19, 2016 00:08 IST

बोर्डीतील दोन मजली इमारतीच्या छतावरून पडल्याने गुरुवार, १७ मार्च रोजी योगिनी हर्षद निजप या ३२ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मूलबाळ होत

बोर्डी : बोर्डीतील दोन मजली इमारतीच्या छतावरून पडल्याने गुरुवार, १७ मार्च रोजी योगिनी हर्षद निजप या ३२ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मूलबाळ होत नसल्याने योगिनीने आत्महत्या केली असावी, अशी माहिती प्राथमिक तपासात घोलवड पोलिसांच्या हाती लागली आहे.दरम्यान, अपघाताच्या दिवशी गुरुवार, १७ मार्च रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास मयत महिलेने सासू पुष्पा हिच्यासह रमेश आरेकर यांच्या दोन मजली इमारतीत प्रवेश केला होता. किंबहुना, रमेश आरेकर यांचा मुलगा सागर याच्याकडून इमारतीत प्रवेश करण्याची परवानगी पुष्पानेच मागितल्याचे सागरने लोकमतला माहिती देताना सांगितले आहे. शिवाय, त्या दोघींना इमारतीत प्रवेश करताना निलेश वरठा या प्रत्यक्षदर्शीने पाहिले होते. सदर इमारतीच्या खालच्या मजल्यावर बँक आॅफ बडोदाची बोर्डी शाखा आहे. प्रत्यक्षदर्शी निलेश वरठा हा सदर बँकेच्या एटीएमचा सुरक्षारक्षक असून घटनास्थळी हजर होता. या प्रकरणात तपासाकरिता बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची मदतही घोलवड पोलिसांना होऊ शकते. योगिनीला आत्महत्या करायची होती तर तिने तिऱ्हाईत व्यक्तीची इमारत का निवडली? सासूने इमारत प्रवेशाची परवानगी का मागितली? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. दरम्यान, अपघात घडल्याच्या दिवशी मयत योगिनीचा पती नोकरीनिमित्त बाहेर होता. (वार्ताहर)