शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

महापालिकेत चार स्वीकृत सदस्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 12:59 AM

उच्च न्यायालयाच्या आदेशाने शिवसेनेला चपराक : भाजपचा टोला; कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण 

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर मीरा भाईंदर महापालिकेने चार स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली आहे. हा माजी आमदार नरेंद्र मेहतांचा विजय असून, मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला लगावलेली सणसणीत चपराक असल्याचा टोला भाजपचे पालिकेतील सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी लगावला आहे. मीरा भाईंदर महापालिकेतील ५ स्वीकृत सदस्य नियुक्तीची प्रक्रिया गेल्या वर्षी  झाली. त्यात भाजपचे ३ व शिवसेना, काँग्रेसचा प्रत्येकी १ सदस्य जाणार आहे. परंतु शिवसेनेचे उमेदवार विक्रमप्रताप सिंह यांच्या संस्थेला कोरोना संसर्ग काळात जेवण पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले होते. ते ठेकेदार असल्याने त्यांच्या नियुक्तीला भाजपने विरोध केला. 

महासभेतदेखील भाजपने विक्रमप्रताप यांचे नाव कापून भाजपचे अजित पाटील, अनिल भोसले, भगवती शर्मा आणि काँग्रेसच्या ॲड. शफीक खान यांच्या नावाला मंजुरी दिली. त्याविरोधात आमदार गीता जैन यांनी तक्रार केली असता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली. दुसरीकडे नितीन मुणगेकर नावाच्या नागरिकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्वीकृत सदस्यांच्या निकष, नियमानुसार उमेदवार नसल्याने नियुक्तीस आक्षेप घेतला. न्यायालयाने त्यावरून नियुक्तीस स्थगिती दिली. परंतु भाजपचे पालिकेतील पदाधिकारी व उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने मुणगेकर यांची याचिका रद्द करून अंतरिम स्थगिती उठवली, तसेच नगरविकास मंत्री यांनी नव्याने सर्वांची सुनावणी घेऊन आठ आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे आदेशही दिले होते. त्यानुसार शिंदे यांनी सुनावणी आयोजित केली. पण, आयत्यावेळी ती पुढे ढकलली. 

त्यामुळे भाजपचे पदाधिकारी व उमेदवार यांनी पुन्हा उच्च नायायालयात धाव घेतली. न्यायालयाने २५ फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेवर ताशेरे ओढत चार दिवसांत या चार स्वीकृत सदस्यांची नावे शासनाच्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या चारही स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होऊन महापालिकेने त्यांची नावे गॅझेटमध्ये प्रसिद्ध केली आहेत. न्यायालयाचा निर्णय स्वीकारावा nस्वीकृत सदस्यांच्या निवडीला खो घालण्याचा केविलवाणा प्रयत्न नगरविकास मंत्रालयाने केला होता. nमात्र, शिवसेनेचे प्रयत्न हाणून पाडण्याचे काम भाजपचे नेते तथा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केले आहे. nन्यायालयाचा निर्णय शिवसेनेने स्वीकारीत आपला पराभव आणि नरेंद्र मेहता यांचा विजय मान्य करायला हरकत नाही, असा टोला सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी लगावला आहे.

nया निर्णयामुळे शिवसेनेला चपराक बसली असून त्यांच्या सर्व प्रयत्नांना या निर्णयाने सुरुंग लावला आहे.nन्यायालयाचा हा निर्णय स्वीकारण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने नामुष्की ओढवली आहे.