शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात बालविवाह नव्हे, प्रौढविवाहाला प्राधान्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 06:27 IST

पालघर हा आदिवासी जिल्हा देशाच्या आर्थिक राजधानी लगत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील एक-दोन तालुक्याचा अपवाद वगळता आधुनिकतेचा शिरकाव झाला आहे.

अनिरुद्ध पाटील -बोर्डी :  पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आदिवासींच्या परंपरा, सामुदायिक विवाहांना प्राधान्य तसेच मागील काही वर्षात या समाजात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहाेचल्याने बालविवाहाच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. तर अन्य समाज प्रौढ विवाहालाच प्राधान्य दिल्याचे दिसून येते. दरम्यान, कोरोनाच्या काळातही बालविवाहाला थारा मिळाला नसल्याचे चित्र आहे.पालघर हा आदिवासी जिल्हा देशाच्या आर्थिक राजधानी लगत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील एक-दोन तालुक्याचा अपवाद वगळता आधुनिकतेचा शिरकाव झाला आहे. समाजधुरीण, समाजसेवक आणि भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक, पद्मश्री अनुताई वाघ, कॉम्रेड गोदावरी परुळेकर अशा अनेकांच्या प्रयत्नाने बालके व महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. शिक्षण महर्षींच्या प्रयत्नाने आणि शासनाच्या आदिवासी प्रकल्पाच्या आश्रमशाळा ज्ञानगंगा घरोघरी पोहाेचण्यास मदत झाली आहे. यामुळे बालविवाह खूपच घटले आहेत. 

कोरोनाकाळातही जिल्ह्यात बालविवाहाला थारा नाहीजिल्ह्यात कोरोनाच्या काळातही बालविवाहाला थारा मिळाला नसल्याचे चित्र आहे. शिवाय येथील आदिवासी समाजातील विवाहाच्या प्रथेप्रमाणे लग्नासाठी कडक धोरण नाही. मासिकपाळी नंतर मुलीला सज्ञान समजले जाते. स्वत:च्या मर्जीने मुलगा-मुलगी एकत्र राहून संसार करतात. त्यानंतर योग्य वेळ ठरवून विवाह केला जातो.आर्थिक सक्षमतेनंतर लग्नबंधनात अडकण्याची इच्छाआदिवासी तरुण-तरुणी उच्चशिक्षित होऊन नोकरी मिळाल्यावर आर्थिक सक्षमता आल्यानंतर लग्नबंधनात अडकण्याची मानसिकता वाढत आहे. तर विविध संस्थांनाकडून सामुदायिक विवाहाचे आयोजन केले जाते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने नोंदणीकृत विवाहाचे प्रमाण वाढले आहे.

विवाह नोंदणी बंधनकारक रेशनकार्ड, मुलांचे शैक्षणिक प्रवेश आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विवाह नोंदणी बंधनकारक आहे. या सर्वांमुळे पालघर जिल्ह्यात बालविवाह होताना दिसत नाहीत. 

जिल्ह्यात काही वेळा पाल्यांच्या विवाहाच्या काही दिवस आधी आई-वडील विवाह करीत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.१,१९९ - सामुदायिक विवाह पार पडले.

पालघर जिल्ह्यात मागील ३५ वर्षांपासून ठाणे जिल्हा श्रमिक झोपडपट्टी सुधार संघातर्फे आदिवासी सेवक कै. अशोक नाना चुरी सामुदायिक विवाह आयोजित करीत. आतापर्यंत १,१९९ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. त्यांचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले आहे. मात्र २१ मार्च रोजी सामुदायिक विवाह आयोजित केला आहे. -संतोष चुरी, पालघर

टॅग्स :marriageलग्नpalgharपालघर