शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

५० टन धान्याची विक्री

By admin | Updated: May 16, 2017 00:46 IST

ठाण्यात विविध ठिकाणी १० दिवस आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून या संपूर्ण महोत्सवात तब्बल

लोकमत न्यूज ब्युरोठाणे : ठाण्यात विविध ठिकाणी १० दिवस आयोजित करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून या संपूर्ण महोत्सवात तब्बल ५० टन धान्याची विक्री झाली. या महोत्सवात सेंद्रिय तूरडाळीबरोबरच तांदळाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली, अशी माहिती आयोजकांनी दिली. ‘नाम फाउंडेशन’ आणि ‘संस्कार’ संस्थेमार्फत हा महोत्सव आयोजित केला होता. हिंगोली, बीड, जालना या जिल्ह्यांतून ३५० शेतकऱ्यांनी आपले धान्य येथे आणले होते. या शेतकऱ्यांचे २५ प्रतिनिधी महोत्सवात सहभागी झाले. यात सेंद्रिय पद्धतीची ज्वारी, तूरडाळ, गहू, हरभरा, उडीद, बाजरी, हळद, चणाडाळ, मसाले, इंद्रायणी तांदूळ, बासमती तांदूळ, मूगडाळ, उडीदडाळ यांचा समावेश होता. १ मे ते ४ मे या कालावधीत गावदेवी मैदान येथे झालेल्या महोत्सवात २५ टन धान्याची विक्री झाली, तर आर्थिक उलाढाल जवळपास १२ लाखांची होती. त्यानंतर, ६ ते १० मे या कालावधीत माझी आई शाळा, पातलीपाडा येथे ९ टन धान्याची विक्री झाली, तर पाच ते सहा लाखांची उलाढाल झाली.ठाणेकरांच्या वाढत्या मागणीनुसार गावदेवी मैदानात ९ व १० मे रोजी पुन्हा धान्याचे स्टॉल्स लावण्यात आले, तर ११ व १२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात हा महोत्सव भरवण्यात आला. शेवटच्या दिवसात १० टन धान्याची, तर संपूर्ण महोत्सवात ५० टन धान्याची विक्री झाल्याचे ‘संस्कार’ संस्थेचे आ. संजय केळकर यांनी सांगितले. धान्य महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजे आणि त्याकरिता इतर संस्थांनीही पुढाकार घेतला पाहिजे. अशी भावना शिवराम घोडके यांनी व्यक्त केली.