मोकाट श्वानांसह प्राणीमित्राचा आत्मक्लेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : नगरपालिका व ग्रामपंचायतच्यावतीने घेण्यात येणाºया स्वच्छता करात श्वानांचा जन्मदर कमी करण्याची तरतूद असतानाही संबंधित ...

Zoological Suicide with Mokat Dogs | मोकाट श्वानांसह प्राणीमित्राचा आत्मक्लेश

मोकाट श्वानांसह प्राणीमित्राचा आत्मक्लेश

ठळक मुद्देपिंजऱ्यात कोंडून घेत केले अनोखे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नगरपालिका व ग्रामपंचायतच्यावतीने घेण्यात येणाºया स्वच्छता करात श्वानांचा जन्मदर कमी करण्याची तरतूद असतानाही संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याच्या मागणीकरिता पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्सचे आशिष गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्वानांसह स्वत: ला पिंजºयात कोंडून घेत आत्मक्लेष आंदोलन केले.
जिल्ह्यात बेवारस श्वानांच्या जन्मदराचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात प्रशासनाला ३० वेळा पत्रव्यवहारही करण्यात आला पण; कारवाई केली नसल्याने श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील वर्षभºयाच्या कालावधीत ३० हजार नागरिकांना श्वानांनी चावा घेतला असून त्यात अनेकांना जीवही गमवावा लागला. तसेच नागरिकांना कोरड्या खोकल्याचा त्रासही मोठ्याप्रमाणात जाणवायला लागला आहे.
पालिकेकडून अनधिकृतपणे श्वानांना मारण्याचे कामही केले जात आहे. त्यामुळे श्वानांचा जन्मदन कमी करण्याकरिता उपाययोजना करावी. जोपर्यंत श्वानांचे जन्मदर नियंत्रित अभियानाचा लेखी आदेश पारीत होत नाही तोपर्यंत आत्मक्लेश आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशाराही आशिष गोस्वामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.

Web Title: Zoological Suicide with Mokat Dogs

टॅग्स :dogकुत्रा