शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. च्या १४ शाळांत पाचवा तर दोनमध्ये आठवा वर्ग प्रस्तावित

By admin | Updated: May 22, 2014 01:23 IST

तालुक्यातील जि.प. च्या १४ शाळांमध्ये पाचवा तर २ शाळांमध्ये इयत्ता आठवीचे वर्ग प्रस्तावित आहेत.

आर्वी : तालुक्यातील जि.प. च्या १४ शाळांमध्ये पाचवा तर २ शाळांमध्ये इयत्ता आठवीचे वर्ग प्रस्तावित आहेत. २00९ च्या बालकांच्या मोफत शिक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी आर्वी पं.स. शिक्षण विभागाद्वारे २0१४-१५ या शैक्षणिक सत्रासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

इंग्रजी शाळेच्या तुलनेत जि.प. च्या मराठी माध्यमांच्या शाळांना सध्या सर्वत्र शालेय विद्यार्थी पटसंख्येच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात चार किमी अंतरावर शाळा नसल्याने शालेत विद्यार्थ्यांना आपल्या राहत्या गावापासून पायपीट करीत दुसर्‍या गावी शिकायला जावे लागते. बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यांतर्गत सर्व शालेय मुलांना शिक्षण मिळावे. शालेय शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी आर्वी तालुक्यातील एक ते चार इयत्ता असलेल्या जि.प. च्या तालुक्यातील तहारी, सिल्ली, जांभुळधरा, काकडधरा, पिंपळगाव (भोसले), तळेगाव (रघुजी), उमरी, सावंगी, गौरखेडा, सर्कसपूर, सायखेडा, सुकळी (उबार), पिपरी, लाडेगाव आदी जि.प. च्या १४ शाळांमध्ये इयत्ता पाचचा वर्ग तर तालुक्यातील काचनूर पाचोड या दोन जि.प. शाळांत आठवा वर्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

तालुक्यातील ज्या शाळांत पाचवा वर्ग प्रस्तावित आहे, त्या सर्व शाळांची पटसंख्या पहिली ते चवथीची २४१ तर आठवा वर्ग प्रस्तावित असणार्‍या पहिले ते सातवीची पटसंख्या १४२ आहे. ज्या शाळेत एक किमीच्या आत पाचवा वर्ग नाही, अशा शाळेत पाचवा वर्ग तर ज्या शाळेत तीन किमीचे अंतर आहे; पण आठवा वर्ग नाही, त्या जि.प. शाळेत आठवा वर्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. आर्वी तालुक्यातील भादोड व पाचोड (विरूळ) ही दोन्ही गावे विद्यार्थ्यांना शिक्षणाला ये-जा करण्यासाठी सोईची नाही. मुलांना शाळेत जाण्याकरिता बारमाही रस्ता नाही. भादोड गावाच्या चार किमी परिसरात जिल्हा परिषदेची एकही शाळा नाही. या परिसरातील गावकर्‍यांना सहा किमीचे अंतर कापून पाचोड गावातील शाळेत यावे लागते. बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यांतर्गत वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १0५ शाळांमध्ये पाचवा तर ४२ शाळांमध्ये आठवा वर्ग प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)