शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Top Marathi News LIVE Updates: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

युवक-युवतींना सैनिकी प्रशिक्षण आवश्यक

By admin | Updated: May 2, 2017 00:20 IST

‘देश प्रथम’ ही भावना युवापिढीत रूजविण्याची गरज आहे. या दृष्टीकोनातून त्यांना योग्य ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

मंगेश जोशी : १८७ वा प्रहारच्या अ‍ॅडव्हेंचर कॅम्पचा समारोपवर्धा : ‘देश प्रथम’ ही भावना युवापिढीत रूजविण्याची गरज आहे. या दृष्टीकोनातून त्यांना योग्य ते प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. विपरित परिस्थितीशी झुंज देण्याचे सामर्थ्य, समाजाप्रती आपुलकी व कृतीतून योग्य संस्कार प्रतिबिंबीत करण्याची गरज आहे. प्रहार समाज जागृती संस्थेचे प्रशिक्षण याच धर्तीवर असल्याने प्रहारचे सैनिकी प्रशिक्षण तरूण-तरूणींना देणे गरजेचे आहे, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी व्यक्त केले. प्रहारच्या १८७ व्या अ‍ॅडव्हेंचर शिबिराच्या समारोप शुक्रवारी सेवाग्राम येथील शहीद राजीव दीक्षित भवन येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रहार संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप दाते तर अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, सामाजिक कार्यकर्ते मोहन अग्रवाल, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, प्रहारचे अध्यक्ष कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर उपस्थित होते. शिबिरात जिल्ह्यातील निवडक ५५ मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.पगार यांनी प्रहार संस्थेचे प्रशिक्षण खडतर असून आजच्या बालकांना तसेच युवापिढीला अशा प्रशिक्षणाची आवड आहे. प्रहारचा कॅम्प इतर शिबिरापेक्षा आगळावेगळा असतो, असे सांगितले. अग्रवाल यांनी प्रहारच्या प्रशिक्षणातून सैनिकी मानसिकता समाजात निर्माण होत आहे, असे सांगितले. बेलखोडे व दाते यांनी मागील २२ वर्षांपासून साहसी शिबिर घेतले जात असल्याचे सांगितले.प्रहार अ‍ॅडव्हेंचर कॅम्पच्या समारोप प्रसंगी सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक परिसरात प्रहारींनी चित्तथरारक १५ प्रकारचे अडथळा पार प्रशिक्षणाचे प्रात्याशिक सादर केले. कार्यक्रमाची सुरूवात ‘शहिदो की चिताओ पर खडी हुई स्वतंत्रता आज लडखडा रही है, क्या हुआ नही पता!, मेरे वतन...’ या देशभक्तीपर गीताने प्रहारींनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी नालवाडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेच्यावतीने शिबिरार्थ्यांना ‘पेन पाऊच’ भेट करण्यात आले. दरम्यान, बाळकृष्ण हांडे, डॉ. शोभा बेलखोडे, सुप्रभात बावनगडे व चेतन खडसे यांनीही मार्गदर्शन केले.प्रास्ताविकातून गुजरकर यांनी प्रहार संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन संतोष तुरक यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रवींद्र गुजरकर यांनी मानले. साहसी शिबिर तथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता अश्विनी घोडखांदे, वैशाली गुजरकर, स्वप्नील शिंगाडे, धीरज कामडी, मंगेश शेंडे यांच्यासह प्रहार स्वयंसेवकांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)