शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा येथील वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. लागलीच वनविभागाचे अधिकारी, ठाणेदार राजेंद्र शेटे व त्यांचे सहकारी यशवंत गोहत्रे घटनास्थळी दाखल झाले.

ठळक मुद्देआगरगाव शिवारातील घटना । नातेवाईकांसह नागरिकांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : जनावरे सोडण्याकरिता शेतात गेलेल्या युवकावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला चढवून त्याला ठार केले. ही घटना आगरगाव शिवारात शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश करीत तत्काळ मृतकाच्या परिवाराला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.भुमेश रमेश गाखरे (२२) असे मृत युवकाचे नाव आहे. तो नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी घरची जनावरे चारण्याकरिता शेतात गेला होता. जनावरे चारल्यानंतर शेतात बांधून तो जेवन करण्याकरिता दुपारी घरी परत आला. जेवन करुन चार वाजता पुन्हा जनावरे सोडण्याकरिता शेतात गेला असता दबा धरुन बसलेल्या वाघाने भुमेशवर अचानक हल्ला चढविला. यात तो जागीच गतप्राण झाला. सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा येथील वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. लागलीच वनविभागाचे अधिकारी, ठाणेदार राजेंद्र शेटे व त्यांचे सहकारी यशवंत गोहत्रे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.पण, येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने नागरिकांच्या आक्रोश वाढला. यावेळी स्थनिक लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना धारेवर धरल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मृतकाच्या परिवाराला तत्काळ मदत आणि घरातील एका व्यक्तिला कायमस्वरुपी नोकरी देण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.वाघाची दहशत कायमतालुक्यात मागील तीन महिन्यांपासून वाघाची दहशत कायम आहे. यापूर्वी धानोली येथील शेतकºयावर वाघाने हल्ला केला होता. तर दुसरी घटना सिंदीविहिरी येथे घडली.येथेही शेतकºयावर हल्ला केला पण ते थोडक्यात बचावले. आजची तिसरी घटना असून परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे आता कशी करावी, असा प्रश्न शेकऱ्यांना पडला असून वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा होणाºया नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे. 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग