शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रो फायनान्स कंपनीविरूद्ध महिलांचा एल्गार

By admin | Updated: March 2, 2017 00:27 IST

मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शासकीय नियम डावलत कर्ज वाटप केले. ग्रामीण तथा शहरी भागातील महिलांनी कर्जही घेतले;

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : ‘कर्जमुक्त, भयमुक्त व सशक्त महिला’चा नारा वर्धा : मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शासकीय नियम डावलत कर्ज वाटप केले. ग्रामीण तथा शहरी भागातील महिलांनी कर्जही घेतले; पण कंपन्यांनी अवाढव्य व्याज व कर्जाची मूळ रक्कम वसूल करण्याचा सपाटा लावला. यामुळे सदर कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी बुधवारी महिलांनी एल्गार पुकारला. बजाज चौकातून मोर्चाद्वारे महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आधार संघटना व विदर्भ राज्य आघाडीच्या नेतृत्त्वात जिल्हा कचेरीवर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या माध्यमातून महिलांनी ‘कर्जमुक्त महिला-भयमुक्त महिला-सशक्त महिला’चा आवाज बुलंद केला. या मोर्चाचे नेतृत्त्व कामगार नेते भास्कर इशापे, अमोल कठाणे, राजाभाऊ लोहकरे, विजय वाखनेडे, श्रीकांत दौड, स्वप्नील देशमुख, अस्लम शेख, नरेंद्र पहाडे, संजय झाडे, प्रणिता वानखेडे, रूखसार फिरोज शेख, मोहन भागवत यांनी केले. बजाज चौकातून दुपारी १ वाजता निघालेला मोर्चा दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. न्यायालय परिसरात मोर्चा अडविल्यानंतर सभा झाली. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले. मोर्चात जिल्ह्यातील विविध भागातील महिला सहभागी झाल्या होत्या.(शहर प्रतिनिधी) कर्जाबाबत संभ्रम कायमच मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज हे रिझर्व्ह बँकेचे आहे. यामुळे ते माफ होऊ शकत नाही, असा तगादा संबंधित कंपन्या तथा साधन या फायनान्स कंपन्यांचे संचालन करणाऱ्या संस्थेने लावला आहे. यामुळे कर्जमाफी होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. चोख पोलीस बंदोबस्त कर्जमुक्तीसाठी बजाज चौक येथून निघालेल्या मोर्चात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता. यामुळे बजाज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग काही वेळासाठी पोलीस छावणीच झाला होता.