शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

महिला आरक्षणाचा दिग्गजांना हादरा

By admin | Updated: October 6, 2016 00:33 IST

जिल्ह्याचे लक्ष असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाची बुधवारी सोडत झाली

जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आरक्षणाची सोडत : नव्या गट-गणांत महिलांनाच संधीवर्धा: जिल्ह्याचे लक्ष असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाची बुधवारी सोडत झाली. आरक्षणाच्या नव्या नियमात ५० टक्के जागा महिलांना देण्याचा नियम अनेकांच्या आशांवर पाणी फेरणारा ठरला. महिला आरक्षणामुळे जिल्ह्यातील दिग्गजांना फटका बसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात नव्याने तयार झालेले पाच गट व गणात महिलांची वर्णी लागल्याने येथे आपली जागा शोधणाऱ्यांच्या आशाही मावळल्या. सर्वांचे लक्ष असलेल्या तळेगाव (टा), अल्लीपूर, वायफड, तरोडा, नाचणगाव, इंझाळा, येळाकेळी व वडनेर या गटाच्या जागा महिलांकरिता राखीव झाल्याने या भागात कायम वर्चस्व राखणाऱ्या दिग्गजांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र विकास भवनात दिसून आले. तर जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष चित्रा रणनवरे यांचा हिंगणी व विद्यमान उपाध्यक्ष विलास कांबळे यांचा सावंगी (मेघे) गट खुल्या प्रवर्गाकरिता राखीव झाला आहे. गत पंचवार्षिकेत संधी हुकलेल्या काहींना नव्या आरक्षणाने तारल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्याचे दिसून आले. बुधवारी निघालेल्या नव्या आरक्षणामुळे राजकीय पक्षांनी या भागात आपले वर्चस्व कायम राखण्याकरिता उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सुकळी (स्टेशन), वरूड, पवनार, सालोड (हिरापूर) व जाम या पाचही गटात महिलांची वर्णी लागली आहे. विकास भवनात गटाचे आणि आठही पंचायत समिती स्तरावर दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत निघाली. आरक्षण काढताना सर्वप्रथम नियम सांगण्यात आले. यात शासनाच्या निर्देशानुसार, ५२ पैकी सात जागा अनुसूचित जातींकरिता राखीव इेवत त्यातील चार जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या. याच नियमानुसार अनुसूचित जमातीकरिता सात जागा राखीव ठेवत त्यातील चार जागा महिलांकरिता आरक्षित करण्यात आल्या. यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गातील आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या प्रवर्गाकरिता १४ जागा देण्यात आल्या. त्यातील सात जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या. यानंतर उर्वरीत २४ जागा खुल्या प्रवर्गाकरिता राखीव करण्यात आल्या. यातील ११ जागा महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या. विकास भवनात सुरू असलेल्या आरक्षण सोडतीच्यावेळी जिल्हा परिषदेचे आजी माजी दिग्गजांची उपस्थिती होती. यावेळी काही सदस्यांनी सुरू असलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हाधिकारी नवाल यांनी त्यांच्या समस्येचे निराकरण करीत आरक्षण सोडतीचे कार्य पार पाडले. आरक्षण जाहीर होताच विकास भवनाच्या आवारात ज्यांचे गट महिलांकरिता राखीव झाला त्यांनी नाराजी व्यक्त करीत नव्या गटाचा शोध सुरू करणार असल्याचे बोलून दाखविले. तर काहींनी पक्ष काय सूचना देतो यावर आपली भूमिका ठरणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)