The woman died in raod accident | कंटेनरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू
कंटेनरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

वर्धा -  लग्न समारंभ आटोपऊन आपल्या गावी नागपूर येथे जात असलेल्या एका दुचाकीस्वारास भरधाव येणाऱ्या एका कंटेनरने  धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.ही घटना आज सकाळी नऊ वाजता येथील विकास चौकात घडली.

मृतक महिलेचे नाव माधुरी एकनाथ भुते वय 30 वर्ष, रा.नागपूर(वाडी) असे आहे. मृतक माधुरी ही आपले पती एकनाथ भुते व 4 वर्षीय मुलीसह देवळी येथील लग्नसमारंभ उरकवून आपले गावी नागपूर(वाडी) येथे आपले मोटार सायकल नी जात होते दरम्यान सकाळी 9 वाजता येथील विकास चौकात नागपूर कडून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने त्यांना जबरदस्त धडक दिली, यात महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.यावेळी जखमी तथा मृतकास नरेश वाटगुळे ,सुजल रननवरे यांनी  ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .अपघात झाल्यानंतर सदर कंटेनेर घटनास्थळावरून पळून गेला यावेळी नगरसेवक हिम्मत अली शहा यांनी वाहनाचा क्र. M H(अस्पष्ट) 7267 असा नोंदविला. घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे


Web Title: The woman died in raod accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.