शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मतदानातील एक टक्का वाढ कोणाच्या पत्थ्यावर ?

By admin | Updated: October 18, 2014 01:47 IST

राजकीय अस्तित्वासाठी आर्वीत अत्यंत चुरशीची व काट्याची लढत वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवण्यास मिळणार आहे.

सुरेंद्र डाफ आर्वीराजकीय अस्तित्वासाठी आर्वीत अत्यंत चुरशीची व काट्याची लढत वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवण्यास मिळणार आहे. निवडणुकीच्या दिवशी कार्यकर्त्यांत झालेली वादावादी हे त्याचेच द्योतक आहे. आर्वीत यंदा झालेल्या निवडणुकीत एक टक्का वाढला आहे. आता हा एक टक्का कोणाच्या पत्थ्यावर येतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. २००९ मध्ये आर्वी विधानसभा क्षेत्राची मतदानाची टक्केवारी ६७.४६ होती. २०१४ च्या विधानसभेत ही एका टक्क्याने वाढून ६८.१३ एवढी झाली आहे. यात तरुण व पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा उत्साह बघायला मिळाला. १५ उमेदवारात ही लढत अखेरच्या दोन दिवसात भाजपा व काँग्रेस या अशा थेट लढतीत परिवर्तित झाली. यात दोन्ही उमेदवार विजयाची खात्री बाळगून आहे. परंतु यात कोण बाजी मारणार यांची चर्चा सध्या सर्वत्र आहे. १९ आॅक्टोबरला सकाळी ८ वाजतापासून येथील गांधी विद्यालयात मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. आर्वी विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रियेदरम्यान व त्यादिवशी काही मतदान केंद्रावर भाजपा-काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. १९ तारखेची मतमोजणीची शांततेत पार पाडण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाच्यावतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. गांधी विद्यालयात या ठिकाणी मतमोजीण केंद्रात जय्यत तयारी व कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. महसूल प्रशासनाच्यावतीने याची विशेष दखल घेण्यात येत आहे. मतमोजणीची सर्वांना प्रतीक्षा आहे. निवडणुकीत कोण निवडून येणार याची चर्चा सध्या सर्वत्र आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी मतदानाच्या टक्केवारील एक टक्क्याची वाढ कोणाला लाभदायक ठरते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.