शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींनी तळ गाठला

By admin | Updated: April 20, 2016 02:18 IST

शहरातील मास्टर कॉलनी क्रमांक १ व मास्टर कॉलनी क्रमांक २ तसेच नगराध्यक्षांचा वॉर्ड क्रमांक १३, गट नेता ...

नागरिकांची भटकंती : नळयोजना कुचकामी
समुद्रपूर : शहरातील मास्टर कॉलनी क्रमांक १ व मास्टर कॉलनी क्रमांक २ तसेच नगराध्यक्षांचा वॉर्ड क्रमांक १३, गट नेता मधुकर कामडी यांचा वॉर्ड क्रमांक ८ यासह वॉड क्रमांक १४, वॉर्ड क्रमांक १५ व वॉर्ड क्रमांक ३ या भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे नागरिकांची पाण्याकरिता फजिती होती आहे. यावर उपाययोजना आखण्याची मागणी आहे.
गावात १९७२ मध्ये तत्कालीन सरपंच स्व. नथ्थूजी काकडे, ग्रामसेवक गजानन कळसकर यांनी गावात नळयोजना अस्तित्त्वात आणली. यावेळी गावाची लोकसंख्या २५०० होती. त्यावेळी ५००० लोकसंख्याचा आराखडा ठेवून ही योजना कार्यान्वित केली होती. आता ४४ वर्षांत समुद्रपूरची लोकसंख्या १२ हजारांवर पोहोचली आहे. येथील वॉर्ड क्र. ८, १३, १४, १५ मध्ये योजना पोहोचली नसल्याने नागरिकांनी विहिरी खोदल्या. या विहिरींचा आता वाढत्या तापमानामुळे पाझर कोरडा झाला आहे. असलेले पाणी गाळयुक्त असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
ले-आऊट मालकानी १० वर्षांपूर्वी ज्या विहिरी निर्माण केल्या होत्या त्याही कोरड्या झाल्या. त्यांची आशा आता शासनाकडे आहे. नगरसेविका कांबळे यांच्या स्वामी विवेकानंद कॉलनीतील सार्वजनिक विहिरीत बारस्कर यांच्या विहिरीतील पाणी नगर पंचायत प्रशासनाने पाईपद्वारे सोडले असल्याने तेथील नागरिकांची तात्पुरती व्यवस्था झाली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची गरज आहे. न.पं. प्रशासनाने पुढील १० वर्षांचा आरखडा घेवून किमान २५ हजार लोकसंख्येचा अंदाज घेत पाणी पुरवठा योजना आखण्याची गरज व्यक्त होत आहे.(ताुलका प्रतिनिधी)

पाणी टंचाईकरिता नागरिकही जबाबदार
सार्वजनिक विहिरीवर प्रत्येक घरमालकाने मोटारपंप लावून बेसुमार उपसा केला. यामुळे आज ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. या परिसरातील पाणी टंचाईकरिता नागरिकच जबाबदार आहे. त्यांनी कधी पाण्याचे महत्त्व समजूनच घेतले नाही. यामुळे या भागात आता पाणी वाचविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.