शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

खैरी धरणातील कालव्याच्या गेटमधून पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: July 21, 2014 00:20 IST

खैरी धरणाच्या मातीच्या भिंतीखाली असलेल्या कालव्याच्या गेटमधून दर तासाला एक लाख लिटर पाणी वाया जात आहे़ याबाबत अनेकदा निदर्शनास आणून देऊनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहे़

कारंजा (घा़) : खैरी धरणाच्या मातीच्या भिंतीखाली असलेल्या कालव्याच्या गेटमधून दर तासाला एक लाख लिटर पाणी वाया जात आहे़ याबाबत अनेकदा निदर्शनास आणून देऊनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहे़ अद्यापही कालव्याचे गेट बंद करण्याचे सौजन्य कुणी दाखविले नसल्याचे दिसते़सध्या धरणात पाणी कमी आहे. यावर्षी पाऊसही कमी झाला़ नागरिकांना प्यायला पाणी नाही़ असे असले तरी एप्रिल महिन्यापासून या कालव्याच्या गेटमधून पाणी वाहून जात असल्याची माहिती शेजारच्या ग्रामस्थांनी दिली. कालव्याचे गेट तांत्रिक दोषामुळे पूर्णपणे बंद करीत नाही, हे खरे असले तरी हा तांत्रिक दोष दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न अधिकारी करीत नाही, हे वास्तव आहे. प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने दर तासाला एक लाख लिटर पाणी वाया जात आहे. या वाया जाणाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांना फायदा तर होत नाहीच, उलट या धरणाच्या काठाशी असलेल्या ‘नारा अधिक २२’ पाणी पुरवठा योजनेला पाणी कमी मिळून फटका बसला आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत या कालव्याच्या गेटमधून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो़ यानंतर एप्रिल महिन्यापासून हे गेट पूर्णपणे बंद करून पिण्याकरिता पाणी धरणात साठविले जावे, असा आदेश आहे; पण यावर्षी या गेटमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला़ तो दोष दूर करण्यात स्थानिक अधिकाऱ्यांना यश आले नाही. परिणामी, पाणी वाहून जात आहे. पं.स. च्या सभेत याबाबत काही प्रतिनिधींनी संबंधित प्रशासनाला प्रश्न विचारला असता गेट बंद केले असून पाणी वाहणे बंद झाल्याची खोटी व दिशाभूल करणारी माहिती सभागृहाला देण्यात आली. खरोखरच या गेटमधून पाण्याचा अपव्यव होतोय काय, याची पाहणी सरपंच नितीन दर्यापूरकर, उपसरपंच नरेश चाफले, ग्रा.पं. सदस्य नितीन चोपडे, कमलेश कठाणे, संजय मस्की, नारा येथील उपसरपंच आशिष टावरी यांनी केली़ यात पाण्याचा अपव्यव सुरू असल्याचे निदर्शनास आले़ वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे धरणाची पातळी झपाट्याने कमी झाली असून नारा अधिक २२ नळयोजना व कारंजा नळ योजना या दोन्ही योजनांना फटका बसला आहे़ त्वरित उपाययोजना व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़(शहर प्रतिनिधी)