शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, विजेची काटकसर म्हणजे भविष्याची गुंतवणूक!

By admin | Updated: October 29, 2014 22:53 IST

नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करून ऊर्जेची निर्मिती केली जाते. मानवी जीवन गतिमान करण्यात वीज महत्त्वपूर्ण आहे. शिवाय जलस्त्रोतही निसर्गत: उपलब्ध असल्याने मानवी जीवन अधिक सुकर झाले

श्रेया केने - वर्धानैसर्गिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करून ऊर्जेची निर्मिती केली जाते. मानवी जीवन गतिमान करण्यात वीज महत्त्वपूर्ण आहे. शिवाय जलस्त्रोतही निसर्गत: उपलब्ध असल्याने मानवी जीवन अधिक सुकर झाले असले तरी या नैसर्गिक स्त्रोतांचा होणारा उपसा आणि अपव्यय पाहता हे स्त्रोत संपण्याच्या वाटेवर आहेत़ ही समस्या जागतिक पातळीवर असली तरी स्थानिक पातळीवर काटकसर, अपव्यय टाळला तर ‘थेंबे-थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे मोठ्या प्रमाणात या स्त्रोतांचे होणारे दोहण वाचविता येईल. शासकीय स्तरावर जागृती अभियानातून वीज, पाणी बचतीचे संदेश दिले जात असले तरी प्रत्यक्ष कृती नसल्याचे निदर्शनास येत असल्याची बाब संबंधितांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. काटकसर दिनानिमित्त नैसर्गिक स्त्रोतांचा हा अल्पसा आढावा़़़एक युनिटची बचत म्हणजे एक युनिट निर्मितीप्रत्येक ग्राहकाने दिवसाला जर युनिटची वीज बचत केली तर दिवसाला एक युनिटची निर्मिती केल्यासारखे होईल. नियमित वीजवापर करताना बरेचदा घरगुती उपकरणे, पथदिवे सुरू राहिल्याने मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होतो. हा अपव्यय थांबविणे म्हणजेच विजेची बचत करणे होय.विजेचा वापर आवश्यक प्रमाणात झाला पाहिजे; पण गरज नसताना विजेचे दिवे, उपकरणे चालू ठेवणे हा प्रकार विजेच्या अपव्ययात मोडतो. नागरिकांनी सजगता दाखवून हा अपव्यय टाळल्यास मोठ्या प्रमाणात वीज बचत होऊ शकते. यासाठी काटकसर करण्याची गरज नाही, अशी माहिती अधीक्षक अभियंता कांबळे यांनी ‘लोकमत’ सोबत बोलताना दिली. एक युनिटची वीज निर्मिती करण्यास लागणारा खर्च आणि घरगुती वापरावर आकारण्यात येणारे युनिटचे दर यात तफावत आहे. एक युनिट वीज वाचविल्यास एक युनिटची निर्मिती होऊ शकते. यामुळे विजेच्या तुटवड्याचे संकट टळेल.