शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भाकरिता वर्धेत आंदोलन

By admin | Updated: May 1, 2015 23:55 IST

वेगळ्या विदर्भाकरिता स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शुक्रवारी महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन व नारे निदर्शने करण्यात आली.

कार्यकर्ते स्थानबद्ध : पोलिसांचा तगडा बंदोबस्त, शासनाचा निषेधवर्धा : वेगळ्या विदर्भाकरिता स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शुक्रवारी महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन व नारे निदर्शने करण्यात आली. तसेच यावेळी प्रंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाणार होते. आंदोलनाकरिता समितीचे पदाधिकारी जमा झाले; मात्र पोलीस बंदोेबस्त असल्याने पुतळ्याचे दहन न करताच आंदोलकांना निषेध नोंदवूनच समाधान मानावे लागले. यावेळी शहर पोलिसांनी उपस्थित सदस्यांना अटक करून स्थानबद्ध केले.स्वतंत्र विदर्भ राज्याकरिता अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर वेगळा विदर्भ करू असे आश्वासन देण्यात आले होेते. भारतीय जनता पक्षाचे शासन येवून आठ महिन्याचा कालावधी होत आहे. असे असतानाही वेगळ्या विदर्भ राज्याकरिता कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही. यामुळे शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्र मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनात माजी आमदार सरोज काशिकर, गंगाधर मुटे, भालशंकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)केवळ निषेध व्यक्त करण्यावरच समाधानआश्वासन देऊनही स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण न केल्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाणार होते. ठरल्याप्रमाणे महात्मा गांधी पुरळ्याजवळ कार्यकर्ते गोळा झाले. परंतु तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने कार्यकर्त्यांना पुतळे जाळता आले नाही. यामुळे केवळ सरकारचा निषेध नोंदवूनच समाधान मानावे लागले. शहरात पुरळ्याचे दहन करण्यात आले नसले तरीही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये समितीच्या कार्यकतर््यांद्वारे पुतळ्याचे दहन केले जाणार असल्याचे यावेळी मुटे यांनी सांगितले. गोदामातील कामगार मागण्यांकरिता रस्त्यावरशासकीय गोदामात काम करणाऱ्या कामगारांच्या राष्ट्रीय कष्टकरी पंचायतीच्यावतीने कामगार दिनी शुकवारी महात्मा गांधी पुतळ्याजवळ विविध मागण्यांकरिता आंदोलन करण्यात आले. यावेळी महत्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कामगारांनी आंदोलन मागे घेतले. मागण्यांच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. शेतकरी शेतमजूर व असंघटित कामगारांसाठी असलेल्या सामाजिक सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी, बाजार समितीत महिला कामगारांना योग्य न्याय मिळावा, वृद्ध कामगारांना पेंशन मिळावी तसेच माथाडी कायद्याची अंमलबजावणी व्हावी आदी अनेक मागण्या राष्ट्रीय कष्टकरी पंचायतच्या वतीने केल्या जात आहे. परंतु या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कामगारदिनी आंदोलन करण्यात आले. परंतु महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोलिसांचा बंदोबस्त असल्याने कामगारांना केवळ निषेध नोंदवून पुतळ्याजवळून काढता पाय घ्यावा लागला.