शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेत वर्धा पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 06:00 IST

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किरायेदार, घरमालक, समाजातील आर्थिक दुर्बल घटक, बेघर, निराधारांना घरकुलाचा लाभ दिला जातो. असे असताना वर्धा शहरात केवळ ज्यांची घरे भाडेतत्त्वावर आहेत, केवळ त्यांचेच आवेदन स्वीकारण्यात आले आहे. ज्यांचे स्वत:चे झोपडे अथवा कुडाचे घर आहे, त्यांना अडीच लाखांचे अनुदान शासनाकडून दिले जाते.

ठळक मुद्देअनुदान देण्यास केंद्र सरकारच उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरिबांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता शासनाच्या योजना आहेत. पंतप्रधानांच्या नावे असलेल्या आवास योजनेचे उद्दिष्ट गाठण्यात केंद्राच्या उदासीन धोरणामुळे यंत्रणा फेल ठरली आहे. या योजनेकरिता पालिकेअंतर्गत केवळ २५७ जणांनाच आवास योजनेचे अनुदान मिळाल्याने केवळ १० टक्केच उद्दिष्टपूर्ती होऊ शकली. परिणामी, वर्धा जिल्हा या योजनेत पिछाडीवर आहे.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किरायेदार, घरमालक, समाजातील आर्थिक दुर्बल घटक, बेघर, निराधारांना घरकुलाचा लाभ दिला जातो. असे असताना वर्धा शहरात केवळ ज्यांची घरे भाडेतत्त्वावर आहेत, केवळ त्यांचेच आवेदन स्वीकारण्यात आले आहे. ज्यांचे स्वत:चे झोपडे अथवा कुडाचे घर आहे, त्यांना अडीच लाखांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. यात केंद्राचा ६० तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग असतो. वर्धा नगरपालिकेअंतर्गत आजपावेतो केवळ २५७ लाभार्थ्यांनाच राज्य शासनाअंतर्गत घरकुलाच्या अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली आहे. केंद्राच्या अखत्यारित ही योजना येत असताना अनुदान देण्यात हात आखुडता घेतला जात आहे. राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात ४० हजार, दुसऱ्या ४० हजार आणि तिसऱ्या टप्प्यात २० हजार असे एकूण १ लाखाचे अनुदान दिले जात असून ही रक्कम पालिकेला प्राप्त झाली आहे. केंद्र सरकारकडून एकूण १ लाख ५० हजारांचे अनुदान दिले जाते. मात्र, ही रक्कम अद्याप पालिकांना प्राप्त न झाल्याने लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.आवास योजना पंतप्रधानांच्या नावाने असताना केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांना आजपावेतो छदामही मिळाला नाही. मात्र, राज्य शासनाकडून लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम पूर्णत: दिली जात आहे. केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात हात आखुडता घेतला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने सहभागाची रक्कम उपलब्ध करून देण्याची गरज आहे.- सुरेश पट्टेवार, जिल्हाध्यक्ष,अ. भा. वीरशैव युवक संघटना, वर्धा

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना