शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस एजन्सीचालकाकडून संचारबंदीचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

समुद्रपूर-हिंगणघाट मार्गावर वैष्णवी गॅस एजन्सीचे गोदाम आहे. घरपोच सिलिंडर वितरित करणे बंधनकारक असतानाही ग्राहकांना घरपोच सिलिंंडर मिळत नसल्याने ग्राहक सिलिंडर घेण्याकरिता गोदामापुढे गर्दी करीत होते. जमावबंदी असतानाही गर्दी उसळत असल्यामुळे याप्रकरणी १०० क्र मांकावर तक्रार करण्यात आली.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : सिलिंडर घेण्यासाठी जमली होती गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जिल्ह्यात १४४ अंतर्गत जमावबंदी लागू असतानाही येथील वैष्णवी गॅस एजन्सीच्या गोदामात सिलिंडर घेण्याकरिता ग्राहकांची एकच गर्दी उसळत होती. त्यामुळे संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एजन्सीचे संचालक अनिल कामडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.समुद्रपूर-हिंगणघाट मार्गावर वैष्णवी गॅस एजन्सीचे गोदाम आहे. घरपोच सिलिंडर वितरित करणे बंधनकारक असतानाही ग्राहकांना घरपोच सिलिंंडर मिळत नसल्याने ग्राहक सिलिंडर घेण्याकरिता गोदामापुढे गर्दी करीत होते. जमावबंदी असतानाही गर्दी उसळत असल्यामुळे याप्रकरणी १०० क्र मांकावर तक्रार करण्यात आली. तक्रारीची दखल घेत तहसीलदार राजू रणवीर, पुरवठा निरिक्षक देसाई व हिंगणघाटचे पुरवठा निरिक्षक टोंग यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांना गर्दी दिसून आल्याने त्यांनी कलम १८८ अंतर्गत जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करीत सदर प्रकरण समुद्रपूर पोलिसांकडे सोपविण्यात आले. त्यांनी एजन्सीचे संचालक अनिल रामभाऊ कामडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंपनीकडून सात दिवसानंतर सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला.३१ मार्चला सिलिंडर आल्याची माहिती ग्राहकांना मिळताच त्यांची एजन्सीत न येता गोदामापुढे गर्दी केली. प्रत्येक ग्राहकाला सिलिंडर देणे हे आमचे कर्तव्य असल्याने त्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहे. आम्ही कोणत्याही आदेशाचे उल्लंघन केले नसल्याचे कामडी यांनी सांगितले.पुरवठ्याअभावी एजन्सीची होतेय अडचणलॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याचे निर्देश असतानाही गॅस कंपनीकडून एजंन्सीला वेळेत सिलिंडरचा पुरवठा होत नाही. त्यामुळे एजन्सीकडून ग्राहकांपर्यंत सिलिंडर पोहोचण्यास विलंब होत आहे. आठवड्याभरानंतर सिलिंडरचा ट्रक आला की आठ दिवसातील ग्राहक एजन्सी किंवा गोदामानुढे गर्दी करीत आहे. असे चित्र जिल्ह्यात इतरत्रही पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर