शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी बंद पाडले रस्त्याचे निकृष्ट बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2015 02:32 IST

मदनी आमगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मदनी येथील सिमेंट रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात होते.

आकोली : मदनी आमगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मदनी येथील सिमेंट रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात होते. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच ग्रामसेविकाला मोक्यावर बोलवून काम बंद पाडण्यात आले. याबाबत ग्रामसेविकेने शाखा अभियंत्यांनाही माहिती दिली. माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी आमदार निधीतून मदना बायपास ते जि.प. प्राथमिक शाळेपर्यंत सिमेंट रस्ता बांधकामाकरिता चार लाख रुपये मंजूर केले होते. तेव्हापासून कामाचे भिजत घोंगडे होते. अखेर कंत्राटदाराला जाग आली व कामास प्रारंभ झाला. रस्ता कामात गिट्टी ऐवजी विहिरीच्या खोदकामातून निघालेले दगडाचे चिपाड वापरले जात होते. प्राकलनाप्रमाणे काम न करता सिमेंटचा अत्यल्प वापर केला जात असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. निकृष्ट दर्जाचे काम हाणून पाडण्याकरिता ग्रामस्थांनी एकजूट करीत काम बंद पाडले. यानंतर ग्रामसेविका जया राठोड यांना पाचारण करण्यात आले. सदर गैरप्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. राठोड यांनी पं.स. शाखा अभियंता खरवडे यांना माहिती दिली असता त्यांनी ४ वाजेपर्यंत येतो, असे सांगितले. ग्रामस्थ त्यांची प्रतीक्षा करीत थांबले; पण सायंकाळपर्यंत ते मदनी गावाकडे फिरकले नाही. यामुळे कंत्राटदाराशी साटेलोटे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत जि.प. स्तरावरून अभियंत्यामार्फत सर्वच कामांची सर्वंकष चौकशी करावी व रस्त्यांचा दर्जा राखावा, अशी मागणीही मदनी येथील नागरिकांनी केली.(वार्ताहर)