महावीर जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

By Admin | Updated: April 20, 2016 02:16 IST2016-04-20T02:16:15+5:302016-04-20T02:16:15+5:30

भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव मंगळवारी सकल जैन समाजाच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

Various programs in the district on Mahavir Jayanti | महावीर जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

महावीर जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

शहरातून रॅली : महावीर कीर्ती स्तंभाचे पूजन
वर्धा : भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव मंगळवारी सकल जैन समाजाच्यावतीने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. अहिंसेचे प्रणेते २४ वे जैन तीर्थकर भगवान महावीर यांच्या जयंती उत्सवाची सुरुवात सकाळी ६ वाजता रामनगर येथील दिगंबर जैन मंदिर येथे जन्म कल्याणक महोत्सव व तीर्थकरांच्या अभिषेकाने झाली.
अभिषेकानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील जैन बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होते. रामनगर येथील मंदिरातून निघालेली रॅली बॅचलर रोड मार्गे सोशालिस्ट चौक, कच्ची लाईन, सराफा लाईन, वंजारी चौक या मार्गे जात स्वाध्याय मंदिरात पोहोचली. येथे महावीर उद्यानात असलेल्या महावीर कीर्ती स्तंभाचे पूजन नारायण निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर येथे एका कार्यक्रमातून विविध कामाचे लोकार्पण झाले.
या कार्यक्रमाला महावीर दिगगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष सुनील मांडवगडे, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष विनायक भुसारी, महावीर पाटणी, चंद्रप्रभू श्वेतांबर जैन मंदिर अध्यक्ष फत्तेपुरीया, स्थानक वासी जैनसंघाचे स्वरूप बोथरा, सुपार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष संजय सव्वालाखे, धनश्याम सावळकर यांच्यासह जैनबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

Web Title: Various programs in the district on Mahavir Jayanti