शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील 'वायगाव हळदी'चा जागतिक बाजारपेठेचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 19:33 IST

Wardha : हळद प्रक्रिया, निर्यातीला मिळणार चालना, शेतकऱ्यांना होणार याचा चांगला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुर्कुमीनचे सर्वाधिक प्रमाण असलेली समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळदीला जगभरातून मागणी वाढू लागली आहे. शासन व प्रशासन स्तरावरून वायगाव हळदीचा विस्तार, प्रक्रिया व निर्यात व्यवस्था उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून प्रोत्साहन मिळणार आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष केंद्रित करून वायगाव हळदीला जागतिक बाजार पेठ उपलब्ध होण्यासाठी संबंधित विभागाला प्रकल्प आराखडा निर्मिती व अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे वायगाव हळदीचा जागतिक बाजारपेठेचा मार्ग मोकळा झाला होणार आहे. 

सन २०१६-१७ मध्ये या आर्थिक वर्षात वायगाव हळद उत्पादक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचे समभाग धारक यांच्याकडून उत्पादित केलेल्या सेंद्रिय हळदीला जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत मासाला विक्री करण्यासाठी हळद प्रक्रिया ते निर्यात व्यवस्था निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत ९० टक्के अनुदानावर थेट डिबीटीद्वारे खरेदी होणार आहे.

थेट हळद उत्पादक शेतकरी शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, शेती संबंधित कार्य करणारी सहकारी संस्थ्या यांच्या स्तरावर हळद प्रक्रिया ते निर्यात व्यवस्था थेट डीबीटी पद्धतीने खरेदीबाबतचा प्रस्ताव तीन कोटी ११ लाख २४ हजार रुपये, शेतकरी उत्पादक कंपनी सदस्यांचा १० टक्के स्वहिस्ता रक्कम अशी ३१ लाख २१ हजार रुपये ९० व टक्के अनुदान हिस्सा अशा ३ कोटी ११ लाख २४ हजार रुपयांच्या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

वायगाव हळदीला जीआय टॅग प्राप्तसन २०१७-१५ आत्मा कार्यालय व वायगाव हळद उत्पादक संघ यांच्या प्रयत्नातून वायगाव हळदेला भौगोलिक निर्देशांक जीआय प्राप्त झाले आहे. त्यामुळे वायगाव हळदीला चांगले दिवस प्राप्त झाले आहे. भौगोलिक निर्देशांक केल्यामुळे निर्यात करण्यासाठी अडचणी दूर झालेल्या असून बहुतांश शेतकरी कुटुंबाच्या जीवनात है पिक सोनेरी दिवस दाखविणारे ठरले आहे.

ब्रिटिश काळापासून हळदीची लागवडसमुद्रपूर तालुक्यातील हळद पीक ब्रिटिश काळापासून घेतले जात आहे. औषधी गुणधर्म असलेल्या या हळदेची जोपासना अजूनही केली जात आहे. सेंद्रिय पद्धतीने पीकवल्या जाणाऱ्या य हळदीला जिल्ह्यातच नव्हे तर परराज्यातूनही अधिक मागणी आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाfarmingशेतीFarmerशेतकरी