शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाने पार केला दीड लाखाचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 05:00 IST

लसीकरणासाठी नागरिक अधिक सजग झाले असून स्वयंस्फूर्तीने लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जात असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला होता. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांचे , ५ फेब्रुवारीपासून फ्रंट लाईन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ४८ केंद्रांवर मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकीकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरु असताना दुसरीकडे लसीकरणही वेगाने सुरु आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत तब्बल १ लाख ६६ हजार ७५५ नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे लसीकरण वेगात होत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत १ लाख ४३ हजार ४४७ नागरिकांनी पहिला तर १९ हजारावर नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याची माहिती आहे.लसीकरणासाठी नागरिक अधिक सजग झाले असून स्वयंस्फूर्तीने लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जात असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला होता. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांचे , ५ फेब्रुवारीपासून फ्रंट लाईन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, सर्व प्राथमिक आराेग्य केंद्रांसह अशा एकूण जिल्ह्यातील ४८ लसीकरण केंद्रांवर नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात लसींचा साठा संपला होता. लसीकरणास मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे शासनाकडे दोन लाख अतिरिक्त लस साठ्याची मागणी नोंदविली होती. त्यानुसार जिल्ह्याला नुकतेच १८ हजार ३६० लस जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस