शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लसकाेंडीमुळे जिल्ह्यात व्हॅक्सिनेशन मोहीम कासवगतीनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

शासनाकडून लससाठा उपलब्ध होताच जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला गती दिली जाते, तर लस संपताच ही मोहीम थंडबस्त्यात पडते. एकूणच लसकोंडीमुळे जिल्ह्यात व्हॅक्सिनेशन मोहिमेला वेळोवेळी ब्रेक लागत ती कासवगतीनेच राबविली जात आहे. अशीच कासवगती कायम राहिल्यास जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला लसीचे दोन्ही डोस मिळण्यासाठी २०२२ उजाडू शकते, असे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मध्ये दिसून आले आहे.

ठळक मुद्देप्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी उजाडू शकते २०२२ : वेळोवेळी नागरिकांचा मिळतोच स्वयंस्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाकडून लससाठा उपलब्ध होताच जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला गती दिली जाते, तर लस संपताच ही मोहीम थंडबस्त्यात पडते. एकूणच लसकोंडीमुळे जिल्ह्यात व्हॅक्सिनेशन मोहिमेला वेळोवेळी ब्रेक लागत ती कासवगतीनेच राबविली जात आहे. अशीच कासवगती कायम राहिल्यास जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला लसीचे दोन्ही डोस मिळण्यासाठी २०२२ उजाडू शकते, असे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मध्ये दिसून आले आहे. उल्लेखनीय म्हणजे जुलै महिन्यात आरोग्य विभागाने लससाठा मिळताच वेळोवेळी लसीकरण मोहिमेला गती दिली. त्याला वर्धा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा स्वयंस्फूर्तच प्रतिसाद मिळाला. परिणामी, वर्धा जिल्ह्याला मुबलक लससाठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

अद्याप पहिलाच डोस मिळेना...

आठवड्यातून काही मोजक्याच दिवशी जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. शिवाय, सध्या प्रत्येक केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. नागरिकांची गर्दी बघून मी स्वत: दोन वेळा लसीकरण केंद्रावरून घरी परतले. लवकरच आपण कोविडची लस घेऊ.सुप्रिया जायले, वर्धा.

सध्या प्रत्येक केंद्रावर लस घेणारे तोबा गर्दी करीत आहेत. त्यामुळे आपणही लसीकरण केंद्रावर जाण्याचे टाळत आहे. मात्र, आपण लवकरच कोविडची लस घेऊ.- राखी वरभे, वर्धा.

शासनाकडून वर्धा जिल्ह्याला अल्प लससाठा देऊन लसकोंडी केली जात आहे. कोविशिल्डच्या ९० हजार तर कोव्हॅक्सिनच्या १० हजार डोसची मागणी आरोग्य विभागाने शासनाकडे नोंदविली आहे. परंतु, प्रत्येक वेळी तोकडा लससाठा वर्धा जिल्ह्याला दिला जात आहे. याचाच परिणाम सध्या लसीकरण मोहिमेवर होत आहे. 

४.८० लाखांचा टप्पा केला पारशासनाकडून वर्धा जिल्ह्याची लसकोंडीच केली जात असली तरी तोकड्या लससाठ्याच्या जोरावर आरोग्य विभागाने आतापर्यंत लसीचे ४ लाख ८० हजार ९३७ डोस दिले आहेत. शिवाय, लससाठा उपलब्ध होताच लसीकरण मोहिमेला गती दिली जात असून, जिल्ह्याला मुबलक लससाठा देण्याची मागणी आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस