शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

औषधीयुक्त बेल वृक्ष ठरतोय शेतकऱ्यांकरिता उपयुक्त

By admin | Updated: October 25, 2014 01:41 IST

रोगाला नष्ट करण्याची क्षमता असलेल्या बेलवृक्षाचे आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वर्धा : रोगाला नष्ट करण्याची क्षमता असलेल्या बेलवृक्षाचे आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेलाच्या झाडाचे फळ विविध औषधींसाठी उपयुक्त ठरते. बहुपयोगी असणारे बेलाचे झाड शेतकऱ्यांचा मित्र म्हणूनही सिद्ध होत आहे. या फळाच्या माध्यमातून शेतीला जोडधंदा मिळाला आहे. फळावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादन तयार केले जात आहे.धार्मिकदृष्ट्या महादेवाला प्रिय बेलपत्र तसेच हिंदू धर्मात महत्त्व असलेल्या व भगवान शिवरूप समजल्या जाणाऱ्या बेल वृक्षाला उन्हाळ्यात बहार येत असल्याने हिवाळ्याच्या दिवसात त्याचे संवर्धन करण्यात येत आहे. या झाडाला उन्हाळ्याच्या दिवसात फळे लागत असतात. यामुळे शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर या वृक्षाची लागवड केली आहे. झाडाच्या फळे व पानापासून आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत सुरू झाले आहेत. काहींनी हा अभिनव उपक्रम आपल्या शेतात सुरू केला आहे. बेलवृक्षाचे शास्त्रीय नाव एगल मामालोस असून सदाफळ, शाण्डिलु (पीडानिवारक) म्हणून ते ओळखल्या जाते. या फळाचे सरबत, मुरंबा व औषधीयुक्त सामर्थ्य यात आहे. वातशामक व पाचन क्रियेसाठी त्याचा उपयोग केला जातो. तर श्रावण महिन्यात घरोघरी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्रे वाहण्याची प्रथा आहे. मंदिर परिसरात हा वृक्ष आढळून येतो. शेतीच्या बांधावर हे वृक्ष लावणेही शेतकऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरत आहे. विशेषत: काटेरी वृक्ष असल्याने माकड वगैरे या वृक्षापासून लांब राहतात. श्रावण महिन्यात बेलपानाची मागणी लक्षात घेता ते आर्थिक स्त्रोत होऊ शकते. तसेच त्याच्या फळातील गरापासून होणारा मुरब्बा व सरबत केल्यास शेतकऱ्यांसाठी जोडधंदादेखील होऊ शकते. अशा औषधीयुक्त गुणांमुळे यातून परमार्थही साधणे शक्य आहे. (शहर प्रतिनिधी)