शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अत्याधुनिक वाहिकेबाबत रुग्ण अनभिज्ञ

By admin | Updated: July 25, 2014 00:00 IST

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे ‘इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस’च्या माध्यमातून गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना तात्काळ सेवा पुरवण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आली़ गत दीड महिन्यांत

पुलगाव : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे ‘इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस’च्या माध्यमातून गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना तात्काळ सेवा पुरवण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आली़ गत दीड महिन्यांत १५ रुग्णांनी याचा लाभ घेतला; पण या रुग्णवाहिकेबाबत सामान्य नागरिकांना माहिती नसल्याने जनजागृतीची गरज भासत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात ७८८ आधुनिक रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत. यापैकी वर्धा जिल्ह्यात ११ तर स्थानिक ग्रामीण रुग्णालयास दीड महिन्यापुर्वी एक रुग्णवाहिका मिळाली आहे. अपघात, गर्भवती महिला, हृदयविकार, साप चावलेले अथवा अन्य गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यास मदत होत आहे. यासाठी कोणत्याही व्यक्तीने १०८ हा दूरध्वनी डायल केल्यास रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविली जाते. वाहिकेत प्राणवायू, रक्तपुरवठा, पल्सरेटींग मशीन, वातानुकूलीत व्यवस्था आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णासोबत दोन डॉक्टरची व्यवस्था असते. चालक सदैव तत्पर असतात. यामुळे रुग्णास नेताना त्रास झाला तर वाहिकेतच त्यास उपचार मिळतो. त्यास भरती करण्यास संपूर्ण सहकार्य केले जाते़ वाहिकेची यंत्रणा विभागाच्या मुख्य कार्यालय पुणे येथे संगणकाद्वारे जोडली असून प्रत्येक हालचालीची नोंद होते़ परिणामी, गडबड होत नाही; पण १०८ व्यवस्थेची फारशी माहिती नाही. दवाखान्यात पत्रके लावली, नातलग वेळप्रसंगी रुग्णवाहिकेसाठी इतरत्र धावपळ व पैशाची तडजोड करताना दिसतात. यात बराच वेळ जात असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. यामुळे कर्मचाऱ्यांनी वेळीच रुग्णांना माहिती देणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी)