शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एक किमी रस्त्याच्या बांधकामातही गैरप्रकार

By admin | Updated: September 8, 2015 04:21 IST

गावातील मुख्य रस्त्याच्या बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंतचे बांधकाम करण्यात येत आहे. या एक किमी रस्त्याची

अल्लीपूर : गावातील मुख्य रस्त्याच्या बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंतचे बांधकाम करण्यात येत आहे. या एक किमी रस्त्याची दुरूस्ती, रस्ता दुभाजक व नाली सौंदर्यीकरण ही कामे १ कोटी ९० लाख रुपयांत प्रस्तावित होती. या कामाला ३० आॅगस्टपासून सुरूवात झाली. यात गैरप्रकार होत असून बांधकाम निकृष्ट होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कामाच्या चौकशीची मागणीही होत आहे.इस्टीमेट प्रत न देता व ग्रा.पं. ला विश्वासात न घेता काम सुरू आहे. या कामाची खोली ३७ से.मी. असताना केवळ ३० से.मी. करण्यात येत आहे. रस्त्याचे रूंदीकरण करताना ५० टक्के माती मिश्रीत गिट्टी वापरली जात आहे. दुसऱ्या कोटसाठी चार एमएम गिट्टी ही चार मिटरऐवजी एक ते दीड मीटर टाकली जात आहे. उर्वरित दीड मिटरमध्ये माती, मुरूम टाकल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधित अभियंता आचार्य व मुख्य अभियंता कुहीकर यांना सूचना दिली. यावरून ग्रामस्थांसमोर पाहणी करून माती मिश्रीत गिट्टी वापरण्यावर बंदी करण्यात आली. माती मिश्रीत गिट्टी काढण्याच्या सूचनाही दिल्या; पण कंत्राटदार कापसे यांनी निकृष्ट काम सुरूच ठेवले. याबाबत माजी ग्रा.पं. सदस्य श्रीराम साखरकर, उपसरपंच रामा धनवीज, ग्रा.पं. सदस्य गोपाल मेघरे तुळशिराम साखरकर, किसना लोणारे, सतीश काळे व ग्रामस्थांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून निकृष्ट काम बंद करण्याचा इशारा दिला. याबाबत बांधकाम विभाग, पोलिसांत तक्रार देण्यात आली.(वार्ताहर)नियमातच काम होईल- बांधकाम विभाग४सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १ कोटी ३० लाख रुपये खर्च करून रस्ता दुरूस्ती, दुभाजक व सौंदर्यीकरणाचे काम केले जात आहे. याचे कंत्राट देवळी येथील कंत्राटदारास दिले असून तो निकृष्ट कामे करीत आहे. यामुळे असंतोष पसरला आहे. याबाबतच्या तक्रारीवरून पाहणी झाली. यात माती मिश्रीत मुरूम, गिट्टी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या; पण कंत्राटदार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी रोडच्या मटेरियलचे सॅम्पल घेऊन परिक्षणासाठी पाठवावे. माझी हकरत नाही. थोडे निकृष्ट काम करून मी माझी पत घालवू शकत नाही.- पांडुरंग कापसे, कंत्राटदार, देवळी.४बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता कुहीकर यांना विचारणा केली असता जे काम सुरू आहे ते योग्यच होईल. इस्टीमेट नुसारच काम होईल. जेथे माती काम केले ते खोदून नव्याने योग्य काम करण्यात येईल, असे सांगितले. प्रत्यक्ष कामाची पाहणी केली असता सदर काम निकृष्ट दर्जाचेच होत आहे.- रामा धनविज, तक्रारकर्ता.सदर कामाबाबत ग्रा.पं. ला बांधकाम विभागाने माहिती दिली नाही. शिवाय ना-हरकत प्रमाणपत्रही मागितले नाही. - ए.व्ही. गव्हाळे, ग्रामविकास अधिकारी.भविष्यात मुख्य रस्त्यासाठी एवढा निधी येणार नाही. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. इस्टीमेटनुसार काम व्हायला पाहिजे. मुरूमाऐवजी माती व चुरीऐवजी मुरूम वापरला जात आहे. - श्रीराम साखरकर, माजी ग्रा.पं. सदस्य.