शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल योजनेतील धनादेश वठण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी

By admin | Updated: May 9, 2015 02:02 IST

वायगाव नजीकच्या सिरसगाव (ध.) येथील महिलेला इंदिरा आवास योजनेचा लाभ देण्यात आला़ यात मंजूर घरकुलाचे बांधकाम ..

वर्धा : वायगाव नजीकच्या सिरसगाव (ध.) येथील महिलेला इंदिरा आवास योजनेचा लाभ देण्यात आला़ यात मंजूर घरकुलाचे बांधकाम करण्यास सांगण्यात आले़ यातील पहिला धनादेशही शासनाने प्रदान केला; पण तो धनादेश दोन महिने लोटूनही बँकेतून वठला नाही़ यामुळे लाभार्थी महिला अडचणीत आली आहे़अनुसया रामचंद्र ढाकरे या महिलेचे नाव सिरसगाव (ध़) ग्रा़पं़ ने इंदिरा आवास योजनेच्या यादीत दिले़ यामुळे पंचायत समिती वर्धामार्फत घरकूल मंजूर झाले. पं़स़च्या अटींचे पालन करून सदर महिलेने स्वत:च्या रकमेचे घरकुलाच्या बांधकामास सुरूवात केली़ यात प्रथम अनुदान म्हणून ३५ हजार रुपयांचा ५५४४२ क्रमांकाचा अ‍ॅक्सीस बँकेचा धनादेश प्राप्त झाला़ सदर धनादेशावर ०४ मार्च हा दिनांक नमूद होता़ लाभार्थी अनुसया ढाकरे यांनी धनादेश भारतीय स्टेट बँक वर्धा येथे जमा केला़ धनादेश बँकेत देऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला; पण अद्याप रक्कम खात्यात जमा झाली नाही़ याबाबत लाभार्थी महिलेने बँकेत विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरे दिली आहे़ या प्रकरणी सिरसगावचे उपसरपंच अमोल उघडे व लाभार्थी महिला ढाकरे यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले़ सदर धनादेशाची अ‍ॅक्सीस बँकेतून रक्कम कपात झाली; पण लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)