शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच गावात दोन ग्रामपंचायत भवन

By admin | Updated: May 9, 2015 02:01 IST

तालुक्यातील चिंचोली (डांगे) गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आत आहे़ गावात २००८ पर्यंत ..

सुरेंद्र डाफ  आर्वीतालुक्यातील चिंचोली (डांगे) गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आत आहे़ गावात २००८ पर्यंत ग्रा़पं़ कार्यालयास स्वतंत्र इमारत नव्हती. यामुळे ग्रा़पं़चे कामकाज जि.प. शाळेच्या इमारतीतून सुरू होते. २००८-०९ मध्ये बाराव्या वित्त आयोगात मंजुरी मिळून इमारतीचे बांधकाम झाले़ यानंतर कामकाज सुरळीत सुरू असताना २०१४-१५ च्या जिल्हा वार्षिक नियोजनातून याच गावात दुसऱ्या ग्रामपंचायत भवनासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे एकाच गावात दोन ग्रामपंचायत भवन कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़तालुक्यातील चिंचोली (डांगे) या गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आत आहे. ग्रा़पं़ कार्यालयाची स्वतंत्र इमारत नसल्याने कामकाज जि.प. शाळेच्या इमारतीतून सुरू होते. २००८-०९ मध्ये जि.प. अंतर्गत बाराव्या वित्त आयोगातून गावात ग्रामपंचायत भवन बांधण्यात आले. त्या कामाचे भूमिपूजन आमदार अमर काळे यांच्या हस्ते झाले होते़ तेव्हापासून गावात ग्रा़पं़ चे कामकाज सुरळीत सुरू होते़ आता २०१४-१५ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून दुसऱ्या ग्रा़पं़ भवनासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला़ या कामाचे भूमिपूजन माजी आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते झाले़तालुक्यातील माटोडा (बेनोडा) ही धनोडी, एकलारा, माटोडा व बेनोडा या चार गावांमिळून मोठी ग्रामपंचायत आहे़ या गावाला अद्यापही हक्काची ग्रामपंचायत इमारत प्राप्त झालेली नाही़ कार्यालय नसलेल्या गावांत ग्रा़पं़ भवन निर्माण होणे गरजेचे असताना एकाच गावात दोन भवनांची निर्मिती केली जात आहे़ हा प्रकार थांबवून ग्रामपंचायत भवन नसलेल्या गावांत इमारतीचे बांधकाम करणे गरजेचे झाले आहे़